SHARE

भाग ५

“किती गोड क्षण असतात ना !! आपली आवडती व्यक्ती आपल्या सोबत, आणि त्या व्यक्ती सोबत कित्येक वेळ बोलत बसायला लावणारी ती एक कॉफी !! त्या समुद्रावरील माझे आणि प्रियाचे सोबतीचे क्षण किती सुंदर होते ना !! आणि आता हे काही क्षण !! ” सुहास हॉलमध्ये बसून विचार करत होता.


तेवढयात प्रिया कॉफीचा कप घेऊन आली.
“सुहास !! घे कॉफी !! “प्रियाच्या डोळयात वेगळीच चमक दिसत होती.
“बस ना!! ” सुहास कॉफीचा कप घेत म्हणाला.
“तुझ्या सोबतचे हे क्षण कधीच विसरणार नाही मी प्रिया !! खरतर सगळं संपलं म्हणून मी हताश झालो होतो!! पण तू अचानक आलीस आणि जगण्याची नवी प्रेरणा मिळाली !! पुन्हा नाहीना मला सोडून जाणार ??” सुहास कित्येक डोळ्यातले भाव बोलत होता.
“नाही !! कधीच नाही !! ” प्रिया थोडी तुटक बोलली.

“घेणं !!! तुझ्यासाठी खास बनवली आहे मी कॉफी !! ” प्रिया कॉफीचा एक घोट घेत म्हणाली.
“मग तर घ्यायलाच हवी !! ” सुहास कॉफी घेत म्हणाला.
“क्या बात है !! तुझ्याच सारखी झाली आहे कॉफी !! एकदम सुंदर !! ” सुहास कप बाजुला ठेवत म्हणाला.
“सगळं काही विसरून नव्याने नात सुरू करण्याची मजाच काही वेगळी असते ना !! “
सुहासच्या या बोलण्याला प्रियाने फक्त एक हासू देऊन प्रतिक्रिया दिली.
“विशालच्या नादी लागून खरंच खूप मोठी चूक केली रे सुहास !!” प्रिया अगदी शांत बोलत होती.
“जाऊदे !! जे होत ते चांगल्यासाठीच होत !! ” सुहास थोडा अस्वस्थ होऊ लागला.
“पण यापुढे मी तुला कधीच त्रास देणार नाही सुहास !! ” प्रिया त्याच्याकडे पाहून बोलत होती.
“यापुढे …!!!”सुहास बोलता बोलता थांबला. जागेवरून उठण्याचा प्रयत्न करू लागला. त्याची धडपड बघून प्रिया त्याच्या जवळ आली.
“काय होतंय सुहास !! “
“काही नाही !! थोड बैचेन वाटतंय मला !!”
“शांत बस जरा !! बरं वाटेल !! ” प्रिया त्याला बसवत म्हणाली.
“नाही !! खूप … कसतरी होतंय मला…!! चक्कर येते!! प्रिया ….!!!!!” सुहास स्वतःला सावरत होता.
“होणारच ना सुहास !! “प्रिया भेसूर हसत म्हणाली.


सुहास जमिनीवर कोसळला. प्रिया फक्त बघत होती. त्याची मृत्यूशी धपडपड चालली होती.
“तुला कायमच माझ्या आयुष्यातून घालवायला आले होते सुहास मी !! तुझ्या नंतर ही सगळी संपत्ती माझी होणार !!! मी आणि विशाल मजेत राहणार !! तुझ्या अस्तित्वाची जाणीव सुद्धा नको होती मला सुहास !! मला माफ कर !! पण तुझ्या जाण्यातच माझं सुख आहे !!” प्रिया मनातलं विष ओकत होती.


सुहास कित्येक वेळ धडपडला. आयुष्याशी अखेर जुंज संपली. विश्वासाची किती मोठी किंमत मोजावी लागली.


“तुला माहितेय !! अखेरच्या क्षणी सुद्धा माझं तुझ्यावर तितकंच प्रेम होत प्रिया!! विश्वास होता त्याचा घात केलास तू !! अखेर तुझ्या मागुन विशाल येताना मी पाहिला आणि डोळे मिटले !! अगदी कायमचे !!! ” सुहासचां प्रत्येक अखेरचा श्वास त्याला बोलत होता. तो शांत पडला होता.
“आणि अखेर माझ्या या देहाला ती शिक्षा भेटलीच पाहिजे !! त्याला त्या मागच्या अंगणात पुरून टाकलं म्हणे यांनी !! नाही ती शिक्षा त्याला व्हायलाच हवी !! कारण त्याच्यातील मला त्याची शिक्षा मिळते आहे !! सुटका नाहीच ना !! इथेच या घरात आजही मी तसाच आहे !! विश्वास आणि विश्वासघात या दोघांचे भांडण बघत !! शेवटच्या श्वासानंतर ती मला कधीच दिसली नाही !! विष दिलं मला तिने !! तिला वाटलं माझी सुटका झाली!! पण त्या नंतर या घरात माझ्या शिवाय पुन्हा मला कोणंचं दिसल नाही!! धुळीत पडलेले ते कॉफीचे दोन कप आजही तसेच आहेत !! कोणी त्याला उचलतंही नाही !! कारण कोणी आता इकडे येतही नाही !! “


“मी म्हटलं होत ना ही कथा माझी आहे !! विश्वासाला तडा जाणारी आहे !! खरतर सांगायची नव्हती मला !! पण तरीही मी सांगीतली आहे !! कारण या मृत्यू नंतरच्या या शिक्षेतून मला खरंच सुटका हवी आहे !! कुठे आहे प्रिया !! जिच्यावर मी इतके प्रेम केले !! तिला बोलावून घ्या इकडे आणि मला या एकांताच्या शिक्षेतून सोडवं म्हणून सांगा !! ना मला भूक आहे !! ना मला तहान !! ना मी अस्तित्व आहे !!ना आभास !! हो मी एक झुळूक आहे !! ज्याला ना कुठे जायचे आहे !! ना कुठे थांबायचे आहे.!! “


शेवट माझा अजूनही अपूर्ण आहे ….

*समाप्त*

✍©योगेश खजानदार

READ MORE

अंतर ( PART 1) || MARATHI LOVE STORY ||

अंतर ( PART 1) || MARATHI LOVE STORY ||

कदाचित मनातलं सांगायचं राहिलं असेल पण मी कधी तुला दुखावलं नाही! आजही तुझ्याबद्दल माझ्या मनात काहीच राग नाही. खरं तर राग मीच धरायला हवा मनात पण मी तो केव्हाच सोडून…
अंतर (भाग -२) || LOVE STORIES ||

अंतर (भाग -२) || LOVE STORIES ||

"माझ्या आठवणीच्या प्रत्येक क्षणात आजही फक्त तूच आहेस. तुझ्या स्पर्शाने बावरून जाणारी मी आजही तुझ्या कित्येक क्षणात जगतेय. तु येशील कधी नी बोलशील माझ्याशी असे वाटते ? आजही तुझ्या आठवणीने…
अंतर (भाग-३) || PART 3|| Love Stories ||

अंतर (भाग-३) || PART 3|| Love Stories ||

सखे असे हे वेड मन का सैरावैरा फिरते तुझ्याचसाठी तुलाच पाहण्या अधीर होऊन बसते कधी मनाच्या फांदिवराती उगाच जाऊन बसते
अंतर(कथा भाग ४)|| LOVE STORY ||

अंतर(कथा भाग ४)|| LOVE STORY ||

"तुझ्या आवडती coffee!!!" प्रिया योगेश समोर येऊन म्हणाली. "थॅन्क्स!!" योगेश प्रिया कडे पाहत म्हणाला. आणि कित्येक वेळ प्रिया कडे पाहतच राहिला. ज्या व्यक्तीने आपल्यावर प्रेम केले तिला आपण साथ द्यायला…
अधुरी प्रित || A Short Heart Touching Love Story ||

अधुरी प्रित || A Short Heart Touching Love Story ||

तु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गेलो पण मला हे कधी कळलच नाही की तुझ माझ्याकडे न पहाणं हे सुद्धा एक…
अधूरे स्वप्न || MARATHI SHORT STORIES ||

अधूरे स्वप्न || MARATHI SHORT STORIES ||

विसरून जाशील मला तू की विसरून जावू तुला मी भाव या मनीचे बोलताना खरंच न कळले शब्द ही वाट ती रुसली माझ्यावरी की वाट ती अबोल तुलाही वळणावरती ते पारिजातक…
काॅफी || COFFEE MARATHI KATHA ||

काॅफी || COFFEE MARATHI KATHA ||

काही क्षण माझे काही क्षण तुझे हरवले ते पाहे मिळवले ते माझे  मी एक शुन्य तु एक शुन्य तरी का हिशेबी मिळे एक शुन्य
दुर्बीण (कथा भाग २) || CUTE MARATHI STORY ||

दुर्बीण (कथा भाग २) || CUTE MARATHI STORY ||

दुर्बीण! दुरवरच जवळ पहाण्याच साधन म्हणजे दुर्बीण ! अगदी एवढासा तारा सुधा मोठा दिसतो त्यात. "काय रे विनायका कामात लक्ष दिसत नाही आज तुझे ?" बाबांचं नाव विनायक त्यांचे शेठ…
दुर्बीण (कथा भाग ३) || DURBIN PART 3

दुर्बीण (कथा भाग ३) || DURBIN PART 3

सायकल म्हणताच बाबांच्या मनात एक विचार आला. या सायकला विकून आपण दुर्बिणी साठी पैसे उभा करू शकतो. बाबा लगबगीने आत घरात गेले. आणि सदाच्या आईला बोलू लागले. "लता सदाच्या दुर्बिणीच…
दुर्बीण (कथा भाग ४) अंतिम भाग || INSPIRATIONAL STORY||

दुर्बीण (कथा भाग ४) अंतिम भाग || INSPIRATIONAL STORY||

पण तेवढ्यात सदाने आई आणि बाबांना हाक मारली. दोघेही लगबगीने बाहेर आले. आणि सदा बोलत म्हणाला. "आई बाबा तुम्हाला माहितेय गेली ३ ४ दिवस मी कशाचा अभ्यास करत होतो??" सदा…
दुर्बीण .. एक कथा..

दुर्बीण .. एक कथा..

स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये चंद्र नी तारे माळून घेतले कधी केला हट्ट मोजण्याचा स्वतःस मी हरवून घेतले..!!
दुर्बीण( कथा भाग १) || MARATHI STORIES ||

दुर्बीण( कथा भाग १) || MARATHI STORIES ||

स्वप्नांच्या या धाग्यांमध्ये चंद्र नी तारे माळून घेतले कधी केला हट्ट मोजण्याचा स्वतःस मी हरवून घेतले..!!
दोन श्वास || A Short MARATHI Heart Touching Story ||

दोन श्वास || A Short MARATHI Heart Touching Story ||

मी राखुन ठेवले होते एक श्वास तुला पहायला एक श्वास तुला बोलायला मनातल काही सांगायला तुझ्या मनातल ऐकायला तुझा हात हाती घ्यायला

Leave a Comment

Your email address will not be published.