विरुद्ध || कथा भाग ४ || VIRUDDH MARATHI KATHA ||

भाग ४

“माझ्या आयुष्यात कधी प्रिया नव्हतीच !! अस मनाला कितीही सांगितलं, तरी ते तिची आठवण पुन्हा करून देतं ना !! म्हणे मी मधे आलो तिच्या आणि विशालच्या प्रेमात !! ती एकदा म्हणाली असती तरी मी त्याच्या मध्ये आलो नसतो..!! ” सुहास स्वतःशीच बोलत होता. अगदी मनात भांडत होता स्वतःशीच.

तेवढ्याच दरवाजा वाजला. बाहेरून कोणी सुहासला बोलावत होत.
“सुहास !! “
“कोण आहे !! ” सुहास दरवाजा उघडत म्हणाला.
“मी आहे प्रिया !! “
सुहासला हे ऐकुन आश्चर्य वाटल्या शिवाय राहील नाही. तो दरवाजा उघडतो तोच प्रिया त्याच्या गळ्यात पडून रडू लागली. तिला सावरत सुहास म्हणाला.
“काय झाल प्रिया !!! “
“सुहास !! खरंचं माझं चुकलं!! मी तुला सोडून जायला नको होत !!” प्रिया रडक्या चेहऱ्याने बोलत होती.
“हो पण झाल काय ???”
“सुहास !! तो खूप वाईट आहे !! त्यानं मला कित्येक स्वप्न दाखवली !! पण सगळी खोटी ठरली!! “
” त्याने तुला काही केलं तर नाही ना ??” सुहास म्हणाला.
“खूप त्रास दिला मला त्याने !! विशाल खरंचं खूप वाईट आहे सुहास !! आज मला त्याच खरं रूप कळलं!! ते प्रेम खोटं होत !! ते सगळं खोटं होत सुहास !! माझी खरंच खूप मोठी चूक झाली!!! ” प्रिया कित्येक अश्रू वाहत बोलत होती.
“आधी तू शांत हो प्रिया !! आत ये !! शांत बस इथे, आणि काय झाल ते नीट सांग !! ” सुहास तिला शांत करत म्हणाला.

प्रिया जवळच्या खुर्चीवर बसली. सुहास तिच्या जवळ बसला. तिला शेजारीच ठेवलेल्या पेल्यातल पाणी देत म्हणाला,
“जे झाल ते एक वाईट स्वप्न होत अस समजून आपण विसरून जावूयात प्रिया !! नव्याने सुरुवात करुयात आपल्या नात्याची !! तुझ्या पोटात वाढणाऱ्या बाळालाही कधी मी अंतर देणार नाही !!प्रेम केलं आहे प्रिया मी तुझ्यावर !! तुझ्या प्रत्येक चांगल्या वाईट गोष्टीत मी तुला साथ देईन याच वचन ही दिलं आहे तुला !! त्या सात फेऱ्यांमध्ये !! सगळं पुन्हा नव्याने सुरुवात करू !!” सुहास प्रियाकडे पाहत बोलत होता. तिला आपलंसं करत होता.

“इतकं सोपं आहे सुहास ??”
“इतकं अवघडही नाही !! ” सुहास तिच्याकडे पाहत म्हणाला.
“मला खरंच काय बोलावं ते कळत नाहीये!!” प्रिया थोडी शांत होत म्हणाली.
“माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे प्रिया !! तू करू शकते पुन्हा नव्याने !!”
प्रिया फक्त सुहासकडे पाहून हसली. पण काही क्षणांपुरतेच. तिच्या हसण्यात कदाचित जुने सारे दुःख लपले होते. त्यानंतर प्रिया आणि सुहास कित्येक अश्रू पुसून आनंदाने राहु लागले. सुहासला सार काही हवंहवंसं वाटू लागलं. त्याच्या मनात प्रिया बद्दल अजून प्रेम वाढू लागलं.

“खरंच सार अचानक बदलून जावं !! आणि वठलेल्या झाडालाही पालवी फुटावी. अस काहीस माझ्या आयुष्यात झालंय !! जे नात संपलं म्हणून मी आसवे गाळत होतो , ते नात नव्याने फुलाव !! खरंच माझाच माझ्यावर विश्वास बसत नाही!! सार काही आता मला सुंदर वाटतंय!! होणं !! आपल माणूस आपल्या जवळ असलं की कस सुंदर वाटत ना!! प्रिया!!! माझ जिच्यावर मनापासुन प्रेम आहे ती ,आता माझ्यावरही प्रेम करायला लागली असेल ना!! सार काही स्वप्न तर नाहीना ???” सुहास स्वतःलाच विचारू लागला.
“अलगद मग ती कळी खुलावी
नात्यास मग या गंध द्यावी
कधी उगाच हसून जावी
कधी माझ्यासवे गीत गावी
सांगून कानात या निघून जावी
अल्लड हसून मज वेड लावी
प्रेम मनातले पाकळ्यात लपवावी
हातात येताच लाजून पहावी
कधीं दिसताच उगाच रुसवी
खोट्या रागास गालावर आणावी
प्रेमात साऱ्या चिंब भिजावी
जणू कळी आयुष्य फुलवून जावी..!!”
होणं !! ही कळी किती सुंदर आहेना !! माझं हे रुक्ष आयुष्य पुन्हा फुलवल या कळीने !!” सुहास गालातल्या गालात हसत मनातच बोलत होता.
प्रिया पुन्हा आयुष्यात आली म्हणून सुहास खूप आनंदी होता. प्रियाही आता पुन्हा पहिल्या सारखं वागण्याचा प्रयत्न करत होती. तिला होणाऱ्या बाळाचा काहीच दोष नव्हता ना?? मग त्याला मारायचं का ?? अस सुहास म्हणाला आणि त्याने प्रियाची आणि त्या बाळाची काळजी घ्यायची ठरवल.
“प्रिया !! ” सुहास तिला बोलावत होता.
“काय रे सुहास !! “प्रिया त्याच्याकडे पाहत म्हणाली.
“बाहेर येतेस माझ्या सोबत ??”
“हो चल ना !! “
प्रिया आणि सुहास दोघेही समुद्र किनारी फिरायला गेले. सार काही चांगलं चालू होत. कित्येक वेळ मजा मस्ती करून दोघेही घरी आले.
“तू बस !! अस अवघडल्या अवस्थेत जास्त त्रास करून घ्यायचा नसतो प्रिया !! “
“अरे पण आपल्या दोघांना मस्त कॉफी करते ना मी ??”
“नाही मी करतो !! तू बस !!” सुहास आग्रह करू लागला.
“अजिबात नाही !! कॉफी तर तुला माझ्याच हातची देणार मी !!” प्रिया जागेवरून उठतं म्हणाली.
“नाही !!” सुहास तिला अडवत होता. पण प्रिया काहीच न ऐकता तडक स्वयंपाक घरात गेली .

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *