भाग ३
“भावनीक नात खरंचं खूप अवघड असतं तोडून टाकणं, त्याला दूर केलं तरी त्रास होतो आणि जवळ ठेवलं तरी अश्रून शिवाय काही मिळत नाही. माझ्या आणि प्रियाच्या मध्ये आता दुसरं कोणतं नात उरलंच नाही. ती माझी मैत्रीण कधी होऊ शकली नाही, ना ती माझी कधी सोबती होऊ शकली. मग हे नात आहे तरी काय ?? खरंच अशा नात्याला नाव तरी काय द्यायचं कळतच नाही. खरंच सात जन्माचे सोबती असे सात फेऱ्यात होऊ शकतात का ?? त्या मनाच काय?? त्याला खरंच त्या नात्याला सात जन्म टिकवायचं आहे का ?? ” सुहास त्या अंधाऱ्या खोलीत बसून होता.
“सुहास !! बाहेर ये !! मला तुला बोलायचं आहे!!” बाहेरून प्रिया सुहासला बोलावू लागली.
कित्येक वेळ प्रिया त्याला बोलावत होती. पण तो आलाच नाही. अखेर कित्येक वेळाने त्याने दरवाजा उघडला. त्याच्या डोळ्यात वेगळेच भाव दिसत होते.
” हा काय वेडेपणा लावलायस तू सुहास !! एवढ काही आकाश कोसळलं नाहीये !!” प्रिया उद्धांपणे सुहासला बोलत होती.
“खरंच म्हणतेयस तू !! एवढ काही झालचं नाही!!” प्रियाच्या डोळयात पाहत सुहास म्हणाला.
” मला वेगळं व्हायचं आहे सुहास !!! मला घटस्फोट हवाय !!” प्रिया शांत बोलत होती.
“ज्या नात्यात काही अर्थ राहिलाच नाही त्याला जपून तरी काय करायचं !! ” सुहास प्रियाकडे न पाहताच बोलत होता.
“तेच म्हणायचं आहे मला !! पण ..!!!”
“पण काय ???” सुहास विचारू लागला.
“मी वाईट आहे, असं मनाला कधी वाटून घेऊ नकोस!! मी जे काही केलं ते फक्त माझ्या प्रेमासाठी!!” प्रिया .
“तू आताही जावू शकतेस प्रिया!!मला एक क्षणही हे नात जपणं अवघड जाईल आता !!” सुहास डोळ्यातील ओघळणाऱ्या आश्रुला आवरत म्हणाला.
प्रिया काहीच न बोलता निघून गेली. सुहास जागच्या जागी बसून राहिला. सगळं काही आवरून प्रिया घरातून बाहेर पडली, ती थेट गेली विशालकडे.
“विशाल !! विशाल !! “
“कोण आहे ??”
“मी आहे प्रिया !!” प्रिया विशालला पाहताच त्याला मिठी मारतच म्हणाली, विशालाल ती अचानक समोर आली हे पाहून आश्चर्य वाटलं.
“प्रिया !! तू इथे कस काय??”
“मी सुहासला सोडून आले विशाल !! कायमची !! “
“काय वेडेपणा आहे हा ??” विशाल थोडा चिडक्या स्वरात म्हणाला.
“पण आपलं ठरलं होत ना !! मी त्याला सोडून येणार!! आणि आपण एकत्र येणार ते !! “
“हो पण ते आता नाही !!” विशाल तिला लांब करत म्हणाला.
“मग कधी विशाल..!! मला नाही राहायचं तिकडे आता !!!” प्रिया अगदीक होऊन म्हणाली.
“आपलं काम होत नाही तोपर्यंत आपल्याला सुहासला सहन करावचं लागेल प्रिया !!” विशाल मनातलं बोलला.
प्रिया एकटक विशालकडे पाहत होती.
” किंवा तू परत गेलीस तरी चालेल प्रिया !! माझ्या डोक्यात वेगळीच कल्पना आहे !! ” विशाल मनातले कित्येक विषारी विचार बोलत होता.
प्रिया आणि विशाल कित्येक वेळ बोलत बसले. पण सुहास मात्र आता एकटा पडला होता. त्याच्याकडे प्रियाच्या आठवणीं शिवाय काहीचं उरलं नव्हतं. त्या आठवणीतून तो काही गोड क्षण शोधत होता.
“हा ऐकांत मला किती छळतो पण त्याच ते छळन मला आता हवंहवंसं वाटायला लागलं आहे !! कारण कोणीतरी असावं लागत आपलंसं म्हणणार !! खोटी नाती !!! खोटं हासू !! खोटी वचने !! सारं काही खोटं वाटायला लागलं होतं !! पण ही आठवण अशी गोष्ट आहे जी कधीच खोटी वाटतं नाही !! कारण तिचं अस्तित्व असतं ..!! अगदी कायमचं !! त्या घरात!!! त्या मनात कुठेतरी !!! होना !! प्रिया गेली !! अगदी कायमची सोडून गेली!! जिच्यावर मनापासुन प्रेम केलं ती अशी क्षणात निघून गेली, पण ठीक आहे !!माझ काय मी सहन करेन दुःख तिच्या जाण्याचं !! पण ती आनंदी असेल तिच्या जगात, हेच महत्त्वाचं !!
तो एकांत सुहासला खूप काही बोलू लागला. त्याच्या प्रत्येक क्षणाला विचारू लागला. इतक सार मिळवूनही अखेर तू एकटाच का?? सुहास मात्र शांत बसू लागला. त्या क्षणाला काहीच बोलत नव्हता. कारण क्षण सारे निरर्थक वाटू लागले होते.
आता दिवस आणि रात्र सारे एकच वाटू लागले. सुहास आपल्या कामात व्यस्त होता. मनात काही शब्द होते .. आठवणीतले.
“नात्यास नाही म्हणालो तरी
आठवणी कश्या पुसल्या जाणारा
नाही म्हणून ती वाट टाळली जरी
त्या मनास कोण आवर घालणार
होतील किती रुसवे नी फुगवे
किती काळ मग दूर राहणार
आज नी उद्या पुन्हा त्या घरात
भेट अशी मग त्यासवे होणार
हो !! चिडले ते क्षण काही आज
उद्यास मग ते विसरून जाणार
नको त्या कटू आठवणीं सोबत
गोड हासू तेव्हा त्यात शोधणार
असेच हे नाते जपायचे
अखेर काय हाती उरणार
संपतील हे श्वास जगायचे तेव्हा
सारे काही इथेच राहणार ..!! “
” अगदी खरं आहे !!! सार काही इथेच राहणार !! ” सुहास स्वतः ला पुटपुटला..