साऱ्या साऱ्या रित्या केल्या कालच्या आठवणीं!! सांग सांग काय सांगू तुझ्या विन न उरे काही!! तू तिथे , मी इथे न उरली आज कहाणी!! सांग सांग कसे आता पुरी करू मी ही गाणी!! वाटेवरती वेगळ्या जाताना न आठवण तुझं आली!! माझे माझे म्हणता म्हणता अनोळखी होऊन गेली!! सारी सारी रात ही आता मझं सतावून गेली!! बघ बघ आकाशातून आता तुझी चांदणी हरवून गेली!! शोधशील तिला कुठे जरी ती तुझी न राहिली!! अश्रू बोलतील तुला किती पण अबोल ती राहिली!! बघ बघ चंद्रा मागे एकदा ती रात्र सांगून गेली!! माझ्या आठवणीत एक टिपूस तिच्या पापण्यात ठेवून गेली!! साऱ्या साऱ्या रित्या केल्या कालच्या आठवणी …! ✍©योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*