"विठू चरणी आज ,दुमदुमली पंढरी साद एक होता, भरली ती पंढरी एक ध्यास , एक ओढ , चंद्रभागेच्या त्या तीरी विठ्ठल विठ्ठल नामात सारी, तल्लीन ही पंढरी उभा तो विठू सावळा, एका त्या विठेवरी तहान भूक , उन्ह नी वारा , विसरले ते वारकरी भेटीस त्या विठ्ठलाच्या, आले ज्ञानोबा माउली टाळ मृदंग वाजत आज, हरवली ती पंढरी एक भाव , एक मन ,गाते ती पंढरी तुकोबांचे अभंग सारे , बोलते ही पंढरी व्यापून सारे आकाश, आपुली ही पंढरी नाव घेता विठू रायाचे , नजरेत एक पंढरी विठ्ठल विठ्ठल नामात सारी ,तल्लीन ही पंढरी ..!!!" ✍️©योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*