Share This:

     विचारांच मंथन कधी थांबतच नाही. सतत या मनात विचारांच्या लाटा उसळत असतात. कधी अनावर होऊन मनाचा भाग ओला करतात अगदी डोळ्यांच्या कडांमधुन  दिसतात आणि हे अनावर बंध विचारांचे तोडुन टाकतात. मनातल्या वादळाला कुठेतरी शांत करायला हवं. नाहीतर घुसमटून जाईल हे मन.

पण मोकळ कराव हे मन कोणाकडे?  कोण सावरू शकेल या लाटांना,  कोण सामावुन घेईन हे वादळ,  आपल्या आकाशाखाली. की असंच कोमेजुन जाईन हे मन सुकलेल्या फुलासारखं. का फक्त आधार या शब्दांचा आणि पानांवर नाचणार्‍या ओळींचा? बंदिस्त एका वहीतलं गुपीत आणि फक्त मनातील खंत , का आधार या भावनेला शब्दांचा , अबोल ते डोळ्याचे भाव मरुन गेले आहेत ? समजुनही ते समजत नाहीत , अश्रूंची ही किम्मत धुळीत मिसळुन, मातीलाही एक करते आपल्या ओलाव्याने, मग मनाच काय रे?  कोणीतरी आहे रे आपल्या जवळ फक्त आपल्या सुखासाठी ही भावनाच विरून गेली दिसतेय. पण ..

सांग त्याला, शब्दांची गरज नाहीये त्याला समजण्याची भावना महत्वाची, समजलं तर आकाश छोट दिसेल आणि सामावुन घेतलं तर हे जगही कमी पडेल त्यासाठी, अशी व्यक्ती असावी मज पाशी ही एकचं ओढ त्यासाठी. पण भुतकाळातल्या गरर्ततेत अडकलेल्या त्याला गरज आहे आजच्या हाकेची, ओढून आपल्या मिठीत घेण्याची की जाऊच नये हे बंध तोडुन पुन्हा गरज आहे त्या बंधनाची.  त्यासाठी गरज आहे ती एकदा समजण्याची, सगळं विसरुन आपलूस कोणी म्हणण्याची. असेलही चुक ती विसरण्याची, बोलणार्‍या नात्यांना साद देण्याची,  मन मोकळं एकदा बोलण्याची अगदी हक्काने भांडण्याची सुद्धा. या मनातील वादळाला सामावुन घेण्याची, लाटांना शांत करण्याची , डोळ्यांची कडा पुसण्याची, गरज आहे ती नातं फुलवायची अगदी मनापासून!!

© योगेश खजानदार