"मी वाट पाहिली तुझी
  पण तु पुन्हा आलीच नाही!!
  वाटेवरती परतुन येताना
  तुझी सोबत भेटलीच नाही!!

 क्षणात खुप शोधताना तुला
  स्वतःस मी सापडलो नाही!!
  मी आणि तुझ्यात तो
  माझाच मी राहिलो नाही!!

 सांगु तरी कोणास काही
  शब्दांत या भावनाच नाही!!
  कळले जरी तुला भाव ते
  तरी तुझ कळतंच नाही!!

 गडगडले आभाळ जरी
  एक टिपुस ही पडला नाही!!
  माझ्या मनाच्या कोपऱ्यात
  ती ओल आता उरलीच नाही!!

 वार्‍या सवे गारवा हा
  मनास तुझ्या स्पर्शत नाही!!
  कितीही गुणगुणले ते वारे तरी
  तुझ ते ऐकुच येत नाही!!

 भावनांचा पाऊस हा
  अखेर आज थांबतच नाही!!
  कितीही व्यक्त केले मन तरी
  मनाची वाट भिजलीच नाही!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

विरह || VIRAH LOVE POEM MARATHI ||

आठवणीत झुरताना कधी तरी मला सांगशील डोळ्यात माझ्या पहाताना कधी तरी ओठांवर आणशील रोज सायंकाळी त्या…
Read More

मागणं || PREM KAVITA ||

बरंचस आता या मनातच राहिल तु निघुन गेलीस मन तिथेच राहिल तुझा विरह असेल माझ दुखः ही ते फक्त आता डोळ्या…
Read More

मन आणि तू..!|| TU MARATHI KAVITA ||

एका मनाची ती अवस्था तुला आता कसे मी सांगू तुझ्याचसाठी त्याचे रुसणे त्यास आता कसे मी समजावू तु नस…
Read More

तु आणि मी || TU AANI MI MARATHI POEM ||

तुझ्या मनातील मी तुझ्या ह्रदयात पाहताना अबोल राहुन शब्दातुनी अश्रुतही राहताना सांग सखे प्रेम तुझे ए…
Read More
Scroll Up