"मी वाट पाहिली तुझी पण तु पुन्हा आलीच नाही!! वाटेवरती परतुन येताना तुझी सोबत भेटलीच नाही!! क्षणात खुप शोधताना तुला स्वतःस मी सापडलो नाही!! मी आणि तुझ्यात तो माझाच मी राहिलो नाही!! सांगु तरी कोणास काही शब्दांत या भावनाच नाही!! कळले जरी तुला भाव ते तरी तुझ कळतंच नाही!! गडगडले आभाळ जरी एक टिपुस ही पडला नाही!! माझ्या मनाच्या कोपऱ्यात ती ओल आता उरलीच नाही!! वार्या सवे गारवा हा मनास तुझ्या स्पर्शत नाही!! कितीही गुणगुणले ते वारे तरी तुझ ते ऐकुच येत नाही!! भावनांचा पाऊस हा अखेर आज थांबतच नाही!! कितीही व्यक्त केले मन तरी मनाची वाट भिजलीच नाही!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*