भाग ८
“हाय , मला वाटलं तू मेसेज करायची विसरून जाशील !!” आकाशने मेसेज केला.
“अशी कशी विसरून जाईल मी !! बघ केला की नाही मेसेज !!”
“हो !! केलास !! बरं वाटलं मेसेज आला ते !!”
“का बरं ? “
“म्हणजे !! मित्र कॉन्टॅक्ट मध्ये असले की बर असत ना !! म्हणून !!”
“अच्छा !! म्हणून इतक्या दिवस मेसेज केला नाहीस का ??”
“अस काही नाही !! पण तुला डायरेक्ट कसा मेसेज करू !! तुला आवडेल नाही आवडणार !!”
“त्यात काय न आवडण्या सारखं !!आपण स्कूल फ्रेंड्स आहोत !! आणि मी तुला ओळखते ना !! “
“हो तेही आहे म्हणा !! बरं जाऊदे ते !! मला सांग मूव्ही कसा होता आजचा ??”
“एकदम मस्त !!! खूप दिवसांनी पाहिला मी मूव्ही!!” सायली आकाशला रिप्लाय करते.
“इतक्या दिवस पाहिला नाहीस ??”
“नाही !!”
“का??”
“एकट कशी जाऊ मूव्हीला !! आज तुम्ही सगळे होतात म्हणून आले मी !”
“अच्छा !!”
आकाशने मेसेज केला. पण कित्येक वेळ त्यानंतर रिप्लाय आलाच नाही. तिने तो मेसेज पाहिलाच नाही. आकाश उताविळ होउन तिच्या रिप्लायची वाट पाहत होता. शेवटी वैतागून तो मोबाईल मध्ये गेम्स खेळू लागला पण त्याच्या मनात सतत तेच होत की सायलीने अजून त्याला रिप्लाय का केला नाही. तो सतत तिचा मेसेज आला का हे पाहत होता. त्याच आता कुठेच लक्ष लागत नव्हतं. न राहवून त्याच्या मनात विचार येत राहिले,
“इतका वेळ झाला अजून का तिचा मेसेज आला नाही ?? काही प्रॉब्लेम्स तर नाहीत ना झाले ?? का तिला माझं बोलणं आवडलं नसेल ?? करू का मीच तिला मेसेज ??” आकाश मेसेज टाईप करायला लागतो. पण पुन्हा थांबतो,
“नाही नको !! उगाच एवढे मेसेज बघून तिला काहीतरी वाटेनं !! त्यापेक्षा तिच्या मेसेजची वाट पाहिलेली बरी !!”
आकाश मोबाईल बाजूला ठेवून देतो. पलंगावर कित्येक वेळ पडून राहतो. पण मनातली चलबिचल त्याला काही स्वस्थ बसू देत नव्हती. तो सतत मोबाईलकडे पाहत राहतो. जणू त्याला सायलीला कधी एकदा बोलेल अस झाल होत. पुन्हा थोड्या वेळाने मेसेज टोन वाजते. अर्धवट झोपेत असलेला आकाश जागा होतो, पाहतो तर सायलीच मेसेज आलेला होता.
“सॉरी आकाश !! रिप्लाय करायला लेट झाला !! अरे आई बाबांसोबत होते त्यामुळे मेसेज नाही करता आला !!”
आकाश मेसेज पाहताच लगेच रिप्लाय करायला टाईप करतो,
“इट्स ओके !! मला वाटलच तू बिझी असशील म्हणून !!”
“होना !! अरे आई बाबांना मी मोबाईलवर चॅटिंग केलेलं अजिबात आवडत नाही !! “
“माझंही असच आहे !! बाबांचं एवढं नाही ,पण आई समोर मोबाईलला हात लावला की ती अशी पाहते की विचारू नकोस !!” आकाश त्यासोबत दोन तीन हसण्याच्या एमोटिकाँस पाठवतो.
सायली सुद्धा त्याला हसण्याच्या इमोटिकाँस पाठवून रिप्लाय करते.
“मग आता कशी बोलतेस तू ?? आई बाबा नाहीत ना जवळ ??”
“माझ्या बेडरूम मध्ये आहे आता !! इथे मी काय करते याच त्यांना काही देणंघेणं नसतं !!”
“होना !! मलाही बेडरूम मध्ये आल्यावर काही टेन्शन नसतं !!”
आकाश आणि सायली त्यानंतर रात्री खूपवेळ चॅटिंग करत होते. त्यावेळी आकाश तिला मध्येच विचारतो.
“सायली एक विचारू का ??”
“हो विचार ना !!”
“या चॅटिंगपेक्षा आपण कॉलवरच बोललो तर ??”
“नाही नको रे !! आई बाबांची रूम माझ्या बेडरूम जवळच आहे बोलण्याचा आवाज गेला तर उगाच विचारत बसतील !! एवढ्या रात्री कोणाला बोलते आहेस !! काय आणि काय !!”
“ओके !! काही हरकत नाही !! मला वाटलं उगाच तुझ्या बोटांना टायपिंगचा त्रास देण्यापेक्षा बोललेल बर !!! “
” होका !! फिल्मी आहेस एकदम !! “सायली हसण्याचा इमोटिकॉन्स पाठवत रिप्लाय करते.
चॅटिंग करत वेळ कसा गेला दोघांनाही कळत नाही. शेवटी पहाटे पाच वाजता दोघेही चॅटिंग थांबवून झोपी जातात. आकाश मात्र या प्रसंगाने खूप खुश होतो. त्याला अगदी जे हवं होत तेच घडलं होत. सायली त्याच्या सोबत त्याच्या अपेक्षेप्रमाणे बोलत होती. त्यांच्या मनात नकळत तिच्याबद्दल एक वेगळीच ओढ निर्माण होऊ लागली होती.
सकाळी आकरा वाजले तरी आकाश उठला नाही हे पाहून बाबा त्याला उठवायला आले. दरवाज्यावर त्यांनी आकाशला उठण्यासाठी हाक दिली. आवाज ऐकून आकाश झोपेतच उठला. दरवाजा उघडताच बाबा आतमध्ये आले, येताच आजूबाजूला अस्तव्यस्त पडलेलं सामान पाहून म्हणाले,
“काय रे हे आकाश !! काय अवस्था केलीस बेडरूमची??”
आकाश मात्र काहीच उत्तर देत नाही. त्याची अजुन झोप गेलेली नाही हे पाहून बाबाच त्याला म्हणतात,
“रात्रभर जागून अभ्यास केला असशील ना ! झोप तू !! मी नाही डिस्टर्ब करत !! “
एवढं बोलून बाबा खोलीतून बाहेर गेले.
तेवढ्यात आकाशच्या मोबाईलची मेसेज टोन वाजते, आकाश अर्धवट झोपेतच मोबाईल हातात घेतो, मेसेज पाहतो,
“गुड मॉर्निंग !!” सायलीचा त्याला मेसेज येतो.
आकाश बेडवरून एकदम उठतो , सायलीला रिप्लाय करतो,
“वेरी गुड मॉर्निंग !! इतक्या लवकर झाली पणं झोप पूर्ण ??”
“अरे हो !! रात्रीं कितीही जागले तरी लवकर सकाळी उठाव लागत !! नाहीतर मग काही खर नाही !!”
“मस्तच !! मलाही आता बाबा झोपेतून उठवून गेले. त्यांना वाटलं मी रात्रभर अभ्यास करत होतो म्हणून !!” आकाश हसण्याचा ईमोटिकाँस पाठवत रिप्लाय करतो.
सायली मेसेज पाहते आणि रिप्लाय करते,
“हो मग सांगायचं ना !! सायली नावाच्या सब्जेक्टचा अभ्यास करत होतो म्हणून !!”
यानंतर आकाश पुन्हा हसण्याचा एमोटिकाँस पाठवतो. त्यानंतर सायलीचा मेसेज येतो,
“चल आपण बोलुयात नंतर !! आता मला नाही बोलता येणार !!”
“ठीक आहे !”
आकाश रिप्लाय करताच मोबाईल बाजूला ठेवून आवरायला जातो. आज मनातून जरा तो जास्तच खुश असतो. आवरताना सतत तो गाणं गुणगुणत राहतो. हे सगळं आईच्या लक्षात येत आई न राहवून त्याला विचारते,
“काय आज गाणं चालू आहे !! अभ्यास झाला वाटतं पूर्ण ??”
आकाश गाणं गुणगुण करायच थाबतो आणि तिला बोलतो,
“अभ्यास तर चालूच आहे !! आज असच जरा माईंड फ्रेश करायला गाणं गुणगुणत होतो !!”
आई काहीच बोलत नाही. आकाशला तिचं ते शांत बसणं थोड खटकत , आईकडे पाहत तो बोलतो,
“आई तुला माझ्यावर थोडा सुद्धा विश्वास नाही का ग ??”
“विश्वासाचा प्रश्न येतोच कुठे !! तुझ रिपोर्ट कार्ड सगळं सांगत !!”
“त्याच काय घेऊन बसली तू !! कॉलेजमध्ये कोणालाही नापास करतात !!”
“असच ??” आई प्रश्नार्थक मुद्रेने विचारते.
“हो !!” आकाश नजर चोरत बोलतो. तिथून निघून जातो.
आईला मात्र आकाशच्या अश्या वागण्याचं आता मनातून दुःख वाटू लागलं होत.
” तो खोटं बोलतोय हे सुद्धा त्याला कळतं नाही याचं दुःख वाटतं. आपणच त्याला संस्कार देण्यात कमी पडतो आहोत असच राहून राहून वाटत. त्याच सतत मोबाइलवर असण, गेम्स खेळणं, आणि अभ्यास न करणं याची त्याला चिंता नाही, हे त्याला कस सांगू मी?. त्याचे वडील तरी किती लक्ष देतील त्याच्याकडे ?? ऑफिस बघतील की घर ?? मग यानंतर मुलांची जबाबदारी कोणावर येते तर आईवर , पण या आईने धाक दाखवावा तो किती , आता आकाशला त्याच्या या वागण्यासाठी हातात काठी घेऊन मारू ?? नाही मला तस करता येत नाही!! आता तो काही लहान राहिला आहे का ?? सगळे मलाच दोष देतील !! मग एक आई म्हणून मी करू तरी काय ?? आई म्हणून अजून किती कठोर बोलू त्याच्याशी ?? माझी नाराजी त्याला कळते आहे पण तरीही तो सुधारत नाही हा दोष कोणाचा ??” आई हतबल होऊन समोर मोबाइलमध्ये पाहत बसलेल्या आकाशकडे बघते, कित्येक वेळ ती तशीच राहते, पण आकाशच्या तेसुद्धा लक्षात येत नाही.
असेच दिवसा मागून दिवस जात राहतात. आकाशचे पेपर जवळ येतात. आकाश आता मात्र मनलावून अभ्यास करण्याचा प्रयत्न करू लागतो. पण मध्येच तो मोबाईलमध्ये मेसेज टाईप करत असतो,
“तुला सांगतो सायली !! फिजिक्स आज कवर झालं तर उद्या केमिस्ट्री सुरू करता येईल !!”
“हे काय असतं ??”
“तू कॉमर्सवाली नाही का ??”
“म्हणूनच म्हटलं हे काय ??” सायली हसण्याचा इमोटिकॉन पाठवत विचारते.
“सांगतो नक्की हा !! भेटल्यावर नक्की सांगतो !!”
“कसे भेटणार आपण !! आई बाबा मला बाहेर अजिबात येऊ देणार नाहीत !! “
“डोन्ट वरी !! तू नाहीस येऊ शकतं !! मी तर येऊ शकतो ना??”
“बरं ठीक आहे !! कस ??”
“तुमच्या घराजवळ मी आलो की मेसेज करतो !! तू गेट जवळ तरी येशील ना ??”
“काय ?? नको रे आकाश !!आई बाबांनी पाहिलं तर उगाच काहीतरी वेगळच होईल !!”
“काही होत नाही !! “
“बघ बाबा तू आता काय करायचं ते !! बरं चल मी नंतर बोलते तुझ्याशी !! मिस यू !!”
आकाश क्षणभर थांबतो, त्याला मिस यू वाचताच काय बोलावं तेच कळेना ,
“हो !! मिस यू टू !!”
आकाश शांत होतो!! त्याच्या मनात कित्येक विचार यायला लागतात,
“दिप्या म्हणत होता ते काही चुकीचं नाहीये , सायली खरंच माझ्यावर प्रेम करते रे !! अजून तिने तस बोलून नाही दाखवलं पणं जेव्हापासून तिने मला मेसेज केलाय तेव्हापासून आजपर्यंत आम्ही सकाळ संध्याकाळ , रात्रंदिवस फक्त बोलतोच आहोत, आमचं बोलणं संपतच नाही ,याला काय म्हणावं मग प्रेमच ना ??” हो प्रेमच आहे हे !! “
आकाश सायली विषयी कित्येक विचार करू लागला, सायली माझ्या मिठीत असती तर किती बरं झालं असताना , रात्रभर आम्ही , नको रे नको , असही काय दिसते रे ती , आकाश सायलीच्या विचारात हस्तमैथुन करू लागला. कित्येक वेळ तो वेड्यासारखा विचार करू लागला, पलंगावर पडून राहिला ,
तेवढ्यात त्याचा फोन वाजला , आकाश फोन पाहतो,