भाग ७
आकाश लगबगीने निघाला. दिपकने जेव्हापासून सायली येणार आहे हे सांगितलं तेव्हापासून त्याला कधी एकदा तिला भेटेन अस झालं होत. बसमध्ये सुद्धा त्याच्या मनात तिचेच विचार होते,
“दिप्या म्हणाल्या पासून मला खरंच काहीच कळतं नाहीये की सायली खरंच माझ्यावर प्रेम करत असेल का? पण मग आजपर्यंत ती कधीच का मला बोलली नाही. शाळेच्या ग्रूपमध्ये सुद्धा ती मला बोलली नाही. मग मला कसे समजणार की ती खरंच माझ्यावर प्रेम करते ते. तिला पाहून आता वर्ष दीडवर्ष होऊन गेले असतील. आताही ती तशीच दिसत असेल का ? की बदलली असेल?? तशीच ती दोन वेण्या घालणारी, साधा पंजाबी ड्रेस घालणारी आणि कधीही मेकअप न करणारी. काय माहित कशी असेल ती आता. ” आकाश विचार करत असतानाच त्याचा स्टॉप आला.
विचारांच्या तंद्रीतून बाहेर येत आकाश बसमधून उतरला. चालत चालत तो सिनेमा हॉल जवळ गेला. समोर कॅन्टीन जवळ त्याला एकटा दीपक वाट पाहत उभा आहे असा दिसला. त्याला पाहताच दिपक त्याच्याकडे पाहून हसला जवळ येत त्याला म्हणाला,
“काय भाई !! एवढा लेट !! “
“दिप्या बसमधून आलोय !! बसला उशीर झाला त्याला मी काय करू ??”
आकाश दिपक कडे पाहत म्हणाला. पण त्याची नजर सर्वत्र फिरत होती. सायलीला शोधत होती. दिपकच्या हे लक्षात आलं, त्याने लगेच विचारलं,
“बस उशीरा आली वैगेरे सगळं ठीक आहे पण शोधतोय कुणाला तू ??”
“कुणाला म्हणजे ?? बाकीचे कुठ गेलेत ??”
“कोण ?? “
“दिप्या मस्करी करू नको !! सगळे येणार होते ना ग्रुप मधले ??”
“ते होय !! येतील येतील !! आत्ताच सुश्याचा कॉल आला होता !! सगळे मिळून येतो म्हणाले !! हे बघ आलेच ते !! “
दीपक समोर हात करत म्हणाला तेवढ्यात आकाश मागे वळून पाहतो, तर त्याला त्यांच्यात सायली कुठेच दिसली नाही , त्याची नजर सगळीकडे फिरते त्या सर्वांच्या मागे ती येत होती. आकाश क्षणभर तिला पाहतच राहतो, त्याला समजत नाही की ती हीच सायली आहे का ?? जी त्याच्या वर्गात होती. त्यांच्या डोळ्यात शाळेत असताना जे चित्र होत त्यापेक्षा आता कैक पटीने सायली बदलून गेली होती. पूर्वीसारखे दोन वेण्या घालणारी ती आता मोकळ्या केसात अधिक सुंदर दिसू लागली होती. त्या ओठांवर आता हलवार लिपस्टिक लावलेली होती. पंजाबी ड्रेस मध्ये असणारी ती आता टीशर्ट आणि जीन्स घालून आली होती. आकाशला तिला पाहताच दुसरे काहीच सुचत नव्हते, तो सतत तिच्या शरीराकडे बघत होता, त्याच्या नजरेत नकळत तिचे नाजूक ओठ येत होते, तिची ती नाजूक कंबर त्याला मोहात पाडत होती. त्या टीशर्ट मध्येही त्याचे लक्ष तिच्या स्तनांकडे जात होते, आकाश फक्त तिला पाहत होता,
सुश्या, सायली बाकीचे सर्व मित्र दीपक आणि आकाश जवळ आले, दीपक सगळ्यांना बोलत होता, आकाश फक्त पाहत होता,
“सुश्या भाई किती वेळ !! “
“दिप्या मला काही बोलू नकोस !! या सायली आणि विक्यामुळे उशीर झालाय !!”
“बरं ते राहुद्या बाजूला !! चला पटकन फिल्म चालू होईल !! “
सगळे आत जायला निघतात. सायली नकळत आकाशकडे पाहते , त्याच्याकडे पाहून हसते, आकाशही हसतो, सायली तेवढ्यात त्याला म्हणते,
“तुपण आलास फिल्मला विश्वास बसत नाहीये !!”
“का?? विश्वास का बसत नाहीये ??”
“तू हुशार विद्यार्थी मला वाटलं अभ्यास करत बसला असशील !! म्हणून म्हटलं !! ” सायली मिश्किल हसत म्हणाली.
“अस काही नाही हा!! ” आकाशही हसत म्हणाला.
दोघेही एकमेकांकडे क्षणभर पाहत राहिले. दीपक मध्येच म्हणाला.
“चला लवकर !! “
सगळे सिनेमा हॉल मध्ये गेले. फिल्म बघण्यात गुंग झाले. पण त्या हॉलमधील अंधारातही आकाश राहून राहून सायलीकडे पाहत होता. त्याच्या डोळ्यांना जणू सायलीची सवय होत चालली होती. हे बरोबर दिपकने हेरल ,शेजारीच बसलेल्या आकाशला तो म्हणाला,
“ये येडचाप !! आता काय हनिमून करतो का काय इथच ?? आल्यापासून बघतोय नजर हटत नाहीये तुझी ??”
“काय भारी दिसायली दिप्या आता ती !!” आकाश हळूच दिपकच्या कानात म्हणतो.
“मीपण बघितलंय ते !! पण जरा कंट्रोल भाई !!! नाहीतर फुकट शिव्या खाशील !! परत यायची नाही ती आपल्या सोबत मग !!”
“गप रे !! चांगलं बोल !! असही आता तुझी वहिनी होणार आहे ती !!”
“इतक्या लवकर ??”
“फिक्स तरी करून ठेवतो की !!”
आकाश असे म्हणताच दोघेही हळूच हसू लागतात, त्याच हसू ऐकून सायली त्यांच्याकडे पाहू लागते, सायली पाहते आहे हे पाहिल्यावर दोघेही गप्प बसून समोर फिल्म बघू लागतात.
यामध्ये दोन अडीच तास कधी गेले कळलं सुद्धा नाही. फिल्म संपताच सगळे बाहेर येतात, फिल्म विषयी चर्चा करत असतात,
“काय हिरोईन होती राव ती !!”
“हे बकवास !! ” आकाश दिपकला म्हणतो.
“एवढी काही वाईट नव्हती रे ती !! तिच्यापेक्षा हिरो खूपच मोठा वाटतो वयाने त्यामुळे ती फिट बसली नाही फिल्म मध्ये !!”
“हेच तर म्हणायचं होत ना मला !! “
आकाश अस म्हणताच दीपक त्याच्याकडे एकटक पाहू लागला.
“बरं ऐकाना मी निघते !! मला परत खूप उशीर होईल घरी जायला ! ” सायली पर्समधून मोबाईल बाहेर काढत म्हणाली.
“ठीक आहे !! तू निघ आम्ही सगळे बसतो गप्पा मारत जरा वेळ !!” सुश्या सायलीकडे पाहत म्हणाला.
“भाई मीपण निघतो !! मलापण उशीर होईल !! ” आकाश मध्येच बोलला.
“ये तुझं काय आता ??” सूश्या मध्येच म्हणाला.
आकाश मात्र एकटक दिपक कडे पाहत राहिला. त्याला नजरेतून इशारे करत होता. दिपकला लक्षात येताच तो म्हणाला,
“भाई जाऊदे त्याला ! आई उशीर झाला तर आपल्यालच रागावेल त्याची !!”
“भाई मग निघ तू !!”
सायली आणि आकाश दोघेही घरी जायला निघतात. बस स्टॉपवर येऊन थांबतात,
“सध्या तू काय करतेस मग ??”
“कॉमर्सला एडमिशन घेतलंय !! पुढे बी. कॉम करायचा विचार आहे !! आणि तू ?”
“सायन्स करतोय बायोलॉजी मध्ये !! “
“वाह मस्तच !! असही तू पहिल्यापासून हुशार आहेस ! “
आकाश गालात हसला. आणि पुढे बोलू लागला,
“इथे पेपरच टेन्शन आलंय मला !! दोन महिन्यावर एक्झाम आहे !! “
“तुला आणि टेन्शन !! काहीही हा !! ” सायली येणाऱ्या बसकडे पाहत म्हणते.
पुढे आकाश बोलणार तेवढ्यात म्हणते,
“चल मी निघते !! बस आली माझी !! “
“बरं ऐक ना !! तुझा नंबर दे ना मला !! “
सायली क्षणभर शांत होते जवळ येणाऱ्या बसकडे पाहत म्हणते,
“आपल्या क्लासच्या ग्रूपमध्ये आहे मी !! तुझा नंबर सेव्ह करते तेथून !! आणि तुला मेसेज करते !!”
“ठीक आहे !! नक्की कर !!”
“हो !! बाय !!
सायली बसमध्ये बसून गेली. आकाशही थोड्या वेळाने आपली बस भेटलीकी घरी निघाला. रात्री उशिरा घरी पोहचला. आई बाबांसोबत गप्पा मारत बसला. पण त्याच पूर्ण लक्ष मोबाईलकडे होत. तो खूप आतुरतेने सायलीच्या मेसेजची वाट पाहत होता.
“मग !! काय होत आज विशेष कॉलेज मध्ये?? ” बाबा त्याला विचारतात.
“आज पाटील सरांचा एक्सट्रा क्लास होता. “
“बरं बरं ठीक आहे !!” बाबा त्याच्याकडे पाहून म्हणतात.
पण आकाश मोबाईलमध्ये बिझी असतो, पुढे बाबा त्याला सांगू लागतात,
“आज आकाश आमच्या ऑफिसमध्ये आमचे सीनिअर गोडबोले साहेब आले होते , त्यांचा मुलगा डॉक्टर आहे !! त्यांना म्हटलं मी तुझ्या बद्दल !! त्यांनी त्यांच्या मुलाचा नंबर सुद्धा दिला मला !! म्हणाले कधीही आकाशला काही अडचण आली तर बिनधास्त त्यांना कॉल करा म्हणून !! “
आकाश मात्र अजूनही आपल्या मोबाईलमध्ये पाहत राहतो,
“मी काय म्हणतो आकाश !! एकदा त्यांच्याकडून विचारून तरी घेऊयात !! पुढे तुझ्या मेडिकल कॉलेजसाठी !! कोणतं कॉलेज चांगलं आहे !! कोणती फॅकल्टी निवडायची वैगेरे !! “
तेवढ्यात आकाशच्या मोबाईलची मेसेज टोन वाजते. आकाश मेसेज पाहतो , अनोळखी नंबर वरून त्याला मेसेज होता ,
“हाय , आकाश , मी आहे सायली, हा माझा नंबर आहे !!”
आकाश एकदम जागेवरून उठतो, समोर बसलेल्या बाबांना पाहून म्हणतो,
“बाबा !! आपण तुम्ही जे काही म्हणताय ते करूयात नक्की !! आत्ता मला अभ्यास करायचा आहे !!! मी जातो माझ्या बेडरूम मध्ये !!”
आकाश पळतच आपल्या बेडरूम मध्ये येतो, आणि सायलीला रिप्लाय करण्यासाठी मेसेज टाईप करू लागतो.