भाग १७
पुढचा प्रवास
“पाहता पाहता आयुष्याची पाने पटापट पलटत गेली, कळलही नाही आयुष्यात कोण राहील आणि कोण नाही. पण आज जे आहेत बरोबर त्यांच्या सोबत आयुष्याचा पुढचा प्रवास करावा एवढंच वाटतं राहत. पण मग मनातल सांगावं तरी कसे हेच मला कळत नाही. सायली सोबत असताना जी माझी अवस्था झाली तीच पुन्हा इथे होईल का ?? की विचारूच नये मी. आहे ती मैत्री जपावी आयुष्यभर असच वाटत राहतं मला. पण मग ही मनाची रुखरुख बोलते मला खूप काही त्याच काय ?? पण त्याला समजावता येईल ना. खरच मनाची ही घालमेल पुन्हा होईल अस कधी वाटलच नव्हतं. पुन्हा मला प्रेम होईल असही कधी वाटलं नव्हतं मला. या पुण्यात माझं अस आहे तरी कोण?? तीच ना ? तिच्याशिवाय मी माझी कल्पनाच करू शकत नाही. या अनोळखी शहरात, तिचं काय तो माझा आधार आहे. ” आकाश खुर्चीवर बसून विचारात मग्न होता.
“आकाश ??” समोर अचानक निशा आली.
“निशा तू आणि इथे ??”
“हो चल आवर !! आज दिनेश दादांच लेक्चर आहे पुण्यात कॉलेज मध्ये !!आपल्याला लवकर आवरून जाव लागेल !!”
“होका !! बरं बस् आवरून आलोच मी !!”
“ठीक आहे !!”
थोड्या वेळाने आकाश आवरून निशा सोबत बाहेर आला. त्याला हे शहर नविन होत. इथली माणसं नवीन होती. त्यामुळे तो फक्त निशा म्हणेल तसेच करत होता.
“निशा !! मला काही माहीत नाही बर !! तू एकटं सोडून जाऊ नकोस मला!!”
“नको रे काळजी करुस !! मी आहे ना !! चल !!”
दोघेही समोर बस स्टॉपवर आले. गर्दीच्या त्या वेळी. आलेल्या त्या बस मध्ये बसले. पण गर्दीत आकाश मागे राहिला आणि निशा पुढे निघून गेली. दोघांचीही ताटातूट झाली. निशा पुढच्या स्टॉपवर उतरली. पण आकाश मात्र बसमध्येच राहिला. त्याला काहीच सुचत नव्हतं. आकाश आपल्या सोबत नाही हे तिच्या लक्षात आल.
” आकाश कुठे गेला?? त्याला म्हटलं होत माझ्या सोबत रहा म्हणून !! ” निशा त्याला सर्वत्र शोधत होती. त्याला पुन्हा पुन्हा फोन लावण्याचा प्रयत्न करत होती.
“हा आकाश फोन का उचलत नाहीये ??”
निशा आकाशच्या काळजीने व्याकूळ झाली. त्याला पुन्हा पुन्हा फोन लावू लागली.
आकाशलाही आपण बसमध्ये पुढे निघून आलो आहोत हे लक्षात आल. तो बसमध्ये निशाला शोधू लागला. ती कुठेच दिसत नव्हती. तो गडबडून गेला. हळूहळू पुढे आला. आणि पुढच्या स्टॉपवर उतरला. खिशातला मोबाईल बाहेर काढून त्याने निशाचे मिसकॉल पाहिले. लगेच त्याने तिला फोन लावला.
“निशा !! “
“आकाश कुठे गेलास तू !! ” निशा फोन उचलत म्हणाली.
“माहीत नाही निशा पण !! तू बसमध्ये कुठेच दिसली नाहीस म्हणून मी उतरलो !! “
“पण कुठे ??”
“नाही माहित हा स्टॉप कुठला आहे ??”
“कोणालातरी विचार ना !!”
आकाश शेजारी उभ्या एका आज्जीना स्टॉप कोणता हे विचारतो. ते कळल्यावर निशाला सांगतो. ती तिथे येईपर्यंत त्याला वाट पाहायला सांगते.
“या आकाशला किती वेळा सांगितलं तरी कळत नाही. मी त्याला निक्षून सांगितलं होत माझ्या सोबत रहा. पण नाही ! आज काही झालं असतं तर !! माझी काय अवस्था झाली असती. हे कळत नाही का त्याला? प्रत्येकवेळी शब्दांनी बोलून दाखवली तरच काळजी आहे हे कळत का ?? पण एक लक्षात येत नाहीये की या आकाशबद्दल मला एवढी काळजी का ?? मी त्याच्या प्रेमात तर नाहीना पडले?? छे छे !! काहीही काय !!” निशा मनातल्या मनात कित्येक विचार करत बसली होती. तिचा चेहरा रडकुंडीला आल्या सारखा झाला होता.
आकाशने सांगितलेल्या स्टॉपवर उतरताच समोरच आकाश स्टॉपच्या बाकावर बसलेला तिने पाहिला. ती आली आहे हे पाहतच तोही जागेवरून उठला. तिच्या जवळ आला, निशा अक्षरशः त्याच्यावर ओरडली,
“तुला कळत नाही का रे आकाश !! मी म्हटलं होत ना !! माझ्या सोबतच रहा म्हणून !!”
“हो हो !! माझ्या लक्षात होत ते !! पण गर्दीत कुठे हरवून गेलो मलाच कळाल नाही !! “
“कळाल नाही !! तू कुठे दिसत नाहीस म्हटल्यावर माझी काय अवस्था ..!! ” निशा बोलता बोलता थाबली.
आकाशही तिच्या बोलण्याने क्षणभर शांत राहिला, त्याला जणू तिच्या मनातल कळलं होत.
“निशा !! आय लव्ह यू !!” क्षणात आकाश बोलून गेला.
निशा फक्त आकाशकडे पाहत राहिली. ती काहीच बोलली नाही. आकाश मात्र तिच्या उत्तराची वाट पाहत राहिला.
“चल !! आपल्याला उशीर होतोय !! “
“माझ्या प्रेमाला होकार नाही दिलास तू !!”
“काही गोष्टी निरुत्तरीत राहिलेल्या बऱ्या असतात आकाश !!”
“तुझ्या आयुष्यात कोणी आहे ??”
“तुझ्या शिवाय कोणा सोबत असते मी ??”
“मग तरीही ??”
“मी म्हटलं ना !! काही गोष्टी अनुत्तरित राहिलेल्या बऱ्या असतात!!”
आकाश पुढे काहीच बोलला नाही. दोघेही दिनेश दादा यांच्या लेक्चरला आले. सगळ्या लेक्चर मध्ये दोघांचं लक्ष सतत एकमेकांकडे होत.
“माझ्या या वर्तुळ संस्थेचे दोन सहकारी आज इथे आपल्यात आपल्या सर्वांना भेटायला आले आहेत, आकाश देशपांडे आणि निशा बर्वे !!” दिनेश दादा दोघांकडे बघत बोलले.
” आमच्या पुण्यातील कार्याची जबाबदारी मी आता या दोघांवर सोपवली आहे. त्यामुळे आपल्या या लेक्चर नंतर एक पॉम्पलेट सर्वांना दिले जाईल त्यामध्ये या दोघांचा नंबर आहे !! तेव्हा इच्छुक मित्रांनी त्यांना नक्की संपर्क करावा !!”
लेक्चर संपल्यानंतर दोघेही दिनेश दादाला भेटायला आले. दोघांच्याही डोळ्यात स्पष्ट लिहिलेलं दिनेश दादाने ओळखलं.
“काय मग आकाश साहेब !! पुणं मानवत ना ??”
“हो !! सुरुवात आहे पण चांगली आहे !! “
“आणि काय निशा ताई !! हल्ली घरी असता तुम्ही !! बरं वाटतं असेल आता !!”
“दादा तुम्ही इथे हवे होतात !! सगळे मिळून इथलं काम केलं असतं !!”
“मला खूप इच्छा आहे !! पण तिकडेही आपलं काम आहे आणि ते पाहावं लागेलच !! बरं चला मी निघतोय नगरला”
“दादा लगेच ??”
“अरे हो !! उद्या तिकडे महत्वाचं काम आहे !!”
दोघेही एकमेकांकडे बघत बसले. दिनेश दादा परतीच्या प्रवासाला निघाले. जाताना निशाकडे पाहून म्हणाले.
“मनातल बोलावं !! म्हणजे आपलं मन हलकं होत !! “
निशा फक्त दादाकडे पाहून हसली.
आकाश आणि निशा घरी जायला निघाले. बसमध्ये एकाच बाकड्यावर बसले. आकाश एकटक बाहेरच्या गर्दीकडे पाहत होता. तेवढ्यात त्याला निशा बोलू लागली,
“आकाश !!”
“हा !! बोल ना !”
“तुला माहितेय !! मी कोणावर प्रेम करेन अस मला कधी वाटलं सुद्धा नव्हतं. पण नकळत तो माझ्या आयुष्यात आला आणि मी त्याच्या प्रेमात अक्षरशः वाहत गेले. त्याच्याशिवाय मला दुसरं कोणी सुचतही नव्हतं. मग या प्रेमात आमच्या दोघात सीमाच उरली नाही. आम्ही दोघे अखंड संभोगात बुडालो. मला त्याचा सहवास हवाहवासा वाटू लागला. पण त्याला फक्त माझ्या शरीराशी देणंघेणं होत. कॉलेज बुडवून त्याच्यासोबत मी फिरायचे. तो म्हणेल ,वाट्टेल तशी मी वागायचे !!”
आकाश सगळं शांत होऊन ऐकत होता. जणू आता आजूबाजूचा आवाज बंद झाला होता.
“एकेदिवशी बाबांना सगळं हे कळाल !! माझे आणि त्याचे नको त्या अवस्थेतले फोटो त्यांनी पाहिले. मला खूप बोलले !! तरीही मी त्याच्यासाठी सगळं सहन करायला तयार होते!! पण त्यानंतर त्याने अक्षरशः माझ्याशी संबंध तोडून टाकले. नंबर बदलला. मित्रांना माझ्याबद्दल काहीही वाईट सांगितले. एकंदरीतच काय तर माझा यापुढे वापर होन शक्य नाही हे त्याला कळलं !! आमच्यात काहीच नात नव्हतं या आविर्भावात तो माझ्यापासून दूर निघून गेला. पुन्हा नवी निशा शोधायला!! पण दुःख कशाच वाटलं माहितेय ??”
“सांग !! आज मनमोकळ सांग !!” आकाश तिच्या हातावर हात ठेवून म्हणाला.
” त्याने आमच नात टिकवायचा साधा प्रयत्नही केला नाही याचं दुःख वाटतं !! माझ्या बाबांना कळलं हे त्याला कळताच तो मागे हटून निघून गेला. त्यावेळी एकदा जरी तो म्हणाला असता की काहीही होऊ दे मी तुझ्या सोबत आहे !! तर सगळ्या दुनियेशी मी लढले असते. “
“आयुष्यात पुन्हा प्रेम होणंही तितकंच महत्वाचं असतं निशा !! मी ही तुझ्यासारख निराश होऊन बसलो होतो !! नको त्या संगतीत स्वतःत भरकटून गेलो होतो. पण आता योग्य मार्गावर आहे मी !!”
“हो पण ते प्रेम खर असावं एवढच मला वाटत !!”
“म्हणजे हे सगळं ऐकून तुला वाटत की मी माझा निर्णय बदलेल अस का ??”
निशा काहीच बोलली नाही.
“चुकीचे माणसं येतात आयुष्यात पण मग सगळीच माणूस जात वाईट आहे अस थोडीच असतं !! तुझ्या भुतकाळाशी प्रेम नाही करायला आलो मी !! तू जशी आहेस त्यावर प्रेम करायला आलो आहे मी !! तुझ्यासारखा भूतकाळ माझाही आहे !! मीही कोणावर तरी प्रेम केलं !! पण तू आयुष्यात आल्यावर खर प्रेम काय असत हे मला कळलं !! त्यामुळे तुझ्या भूतकाळामुळे माझ्या प्रेमावर काहीही परिणाम होणार नाही. “
निशा एकटक आकाशकडे पाहत राहिली. क्षणभर शांत राहिली आणि म्हणाली,
“आकाश !! आय लव्ह यू !! खरतर तुला पहिल्यांदा पाहिलं तेव्हाच मी तुझ्या प्रेमात पडले होते. पण पुन्हा प्रेमात चुकायच नाही यामुळे मी गप्प राहिले!!”
“त्यामुळेच तर मला कळलं ना !! तुझ माझ्यावर किती प्रेम आहे ते !!”
दोघेही एकमेकांकडे बघून हसले. एकमेकांत हरवून गेले. तेवढ्यात कंडक्टर म्हणाला.
“लास्ट स्टॉप “
दोघेही बस मधून उतरले आणि आपल्या पुढच्या प्रवासाला निघाले.