वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||

भाग १५

संगत

सकाळ होताच आकाश आपल्या कामाला लागतो. पण तरीही त्याच मन नकळत दिनेश कर्णिक यांच्या विचारांवर फिरत होत. आपण कुठेतरी चुकत आहोत याची जाणीव त्याला होत होती. थोड्यावेळाने त्यानं त्यांना भेटायचं ठरवलं. आवरून तो त्यांनी दिलेल्या पत्त्यावर गेला. एक भलामोठा वाडा होता तो. त्यामध्ये चहूबाजूंनी झाडे होती. आकाशला आतमध्ये जाताच पिंपळाच्या पानाचा वाऱ्याने होत असलेला आवाज ऐकू येत होता. मध्येच एखादी चिमणी चिवचिव करत होती. त्याच्यापलिकडे थोड आतमध्ये जाताच त्याला विविध पक्षाचे थवे या झाडांवरून दुसऱ्या झाडावर जाताना दिसले, यामध्ये त्यांचा किलबिलाट चालू होता. थोड पुढे जाताच आकाश मध्येच थांबला ,कोण एक सुंदर मुलगी त्याला दिसली तिने त्याला विचारलं,
“आपण कोण ??”
अचानक समोर आलेल्या मुलीला पाहून आकाश क्षणभर गोंधळात पडला आणि खिशातील पोंप्लेट काढून त्याने तिला दाखवत विचारलं,
“मला दिनेश कर्णिक यांना भेटायचं आहे !!”
“तुम्ही ओळखता का त्यांना ?? “
“ओळख अशी नाही !! पण काल ते माझ्या कॉलेज मध्ये आले होते त्यामुळे आज त्यांना भेटावसं वाटलं म्हणून मी इथे आलो!!”
“बरं बरं !! तुम्ही या बाकड्यावर बसा त्यांना मी सांगते !! ते येतील भेटायला!! “
“ठीक आहे !! “

आकाश समोरच्या बाकड्यावर बसला. त्याला फक्त आजूबाजूच्या झाडांचे आवाज आणि किलबिलाट एवढंच ऐकू येत होत. थोड्या वेळाने दिनेश कर्णिक त्याच्या भेटीला आले. अगदी साधे सहजपणाने त्यांनी आकाशचे हसून स्वागत केले.

“नमस्कार !! “
“नमस्कार सर !!”
मध्येच आकाशला थांबवत कर्णिक म्हणाले.
“सर नाही !! दादा म्हणायचं !! सर या शब्दात खूप ओझं असतं !!”
अस म्हणताच आकाश त्याच्याकडे बघून हसला आणि पुढे मनमोकळे पणाने बोलू लागला.
“माझं नाव आकाश देशपांडे !! मला काल तुमच्या बोलण्याने खरंच माझ्यातील कित्येक चुका कळून आल्या !! आणि तुम्हाला भेटण्यासाठी कधी एकदा इकडे येतोय अस झाल होत. “
“वाह ! !! चला म्हणजे कालच्या माझ्या लेक्चरचा काहीतरी फायदा झाला तर !!”
“फायदा नाही !! मार्ग मिळाला मला!! “
“गुड !! मला तुला इथे पाहून खरंच खूप आनंद झाला !! “
“मलाही आपल्याला भेटून खरंच खूप आनंद झाला !! आणि मला आपल्यात सामील करून घ्या म्हणून विनंती करायला आलोय !! “
“म्हणजे काल मी वर्णन केलेल्या गोष्टी तुझ्याही बाबतीत घडतायत तर !”
“हो !! “
“कोणती गोष्ट तुला सगळ्यात जास्त त्रास देत आहे ??”
कर्णिक यांनी विचारताच आकाश क्षणभर शांत राहिला , कर्णिक यांनी त्याला पुढे काय म्हणायचं आहे हे ही न बोलताच ओळखलं.
“हस्तमैथून ??”
आकाशाने होकारार्थी मान हलवली. आणि पुढे बोलला,
“दहावीच्या परीक्षेत शाळेत पहिला आलो होतो. बाबांनी मोबाईल घेऊन दिला आणि मग त्यावर गेम्स, पोर्न बघणे अश्या सवयी लागत गेल्या !! पुढे त्याच रूपांतर हस्तमैथुन करण्यात झालं. आणि इकडे आल्यावर तर दारू आणि सिगरेट अविभाज्य भागच झाला. मला खरंच कळतं नाहीये की या सगळ्यातून बाहेर कसा पडू !! ” आकाश हताश होऊन सगळं सांगत होता.
“हे बघ आकाश ! ! तरुणपणी आपण आपल्या मोहावर तसेच सगळ्यात महत्त्वाचे आपल्या संगतीवर लक्ष दिले पाहिजे. अति मोह आपल्याला खड्ड्यात घेऊन जातो हे नक्की !!”
“खड्ड्यात तर गेलोच आहे मी !! मला डॉक्टर व्हायचं होतं !! पण इथे येऊन बीएसस्सीला एडमिशन घेतलंय !! “
“नक्कीच !! तुझ दुःख मी समजू शकतो आकाश !! पण झालं गेल सोडून द्यायचं !! पुढे निघायचं !!”
“हो पण पुढे जायचा मार्गच मला दिसत नाहीये !! “
“नक्की दिसेल !! शोधल्याने सगळं मिळत !! “
कर्णिक बोलत असताना मध्येच ती मगाशीची मुलगी त्यांना येऊन बोलू लागली,
“दादा !! सगळी तयारी झाली आहे !! निघायचं !! “
“हो चला !! एक मिनिट !” आकाशकडे पाहत कर्णिक म्हणाले.
“आकाश तू का नाही जॉईन होत आजच्या आमच्या ट्रिपमध्ये !!”
“हो पण !! मी अजून तुमच्या संस्थेत प्रवेश ही घेतला नाहीये !! चालेल तुम्हाला??”
“तू इथे आलास !! आमच्याशी मनमोकळे बोललास !! झालं तुझा प्रवेश झाला या संस्थेत चल बर !!”

आकाश लगेच कर्णिक आणि त्याच्या टीमसोबत जाण्यास तयार झाला. सगळ्यांनी आपल्या समोरच्या बाईकवर बसून निघायचं ठरवलं. सगळे बसले आकाश मात्र तसाच उभा राहिला. तेवढ्यात त्याच्या समोर पुन्हा ती मुलगी आली आणि तिने बाईकवर बसण्यास सांगितले. आकाश तिच्या बाईकवर मागे बसला. त्याला एका मुलीच्या बाईकवर आपण बसलोय याच नवल वाटतं होत. ती एकदम बिनधास्त होती. बाईक एकदम मुलांसारखी , त्यांच्या बरोबरीने चालवत होती. सगळ्यात पुढे कर्णिक आपली बाईक चालवत होते, थोड्या वेळाने ते बाईक एका डोंगराच्या जवळ घेऊन आले. तिथे बाईक लावून त्यांनी सर्वांना आपल्या सोबत घेतलं,

” माझ्या मित्रांनो !! आपण नेहमी एका वर्तुळात जगतो !! पण जीवन हे काही वर्तुळ नाही !! तुम्ही या ब्रह्मांडाच्या जेवढे बाहेर झालं तितक वेगळेपण हे ब्रह्मांड तुम्हाला देईल !! तसेच तुम्ही स्वतःकडे पाहा ,इथे कोणते बंधन नाही !! बंधन घालत ते हे शरीर आणि त्याचा मित्र मन !! “
आकाश कर्णिक यांचं बोलणं मनापासून ऐकत होता.
“पण बघा ना !! हे मन वाट्टेल तिथे फिरून येत आणि पुन्हा आपल्याला आठवणींच्या बंधनात अडकत ठेवण्याचा प्रयत्न करत. सुखाच्या आठवांचा काहीच प्रॉब्लेम नाही !! पण त्या वाईट आठवणींना आज आपल्याला इथे सोडून ,फेकून द्यायच आहे !!”
“पण कस दादा ? मी कितीही प्रयत्न केला तरी नाही सोडू शकतं त्या आठवणी !!” एक आकाशच्या वयाचा मुलगा म्हणाला.
“यालाच तर आपल्याला हरवायच आहे !!चला माझ्या सोबत “

आकाश आणि सगळे मित्र कर्णिक याच्या मागे जाऊ लागले. आकाशचे मात्र लक्ष हळूहळू त्या मुलीकडे जाऊ लागले. तिच्या सौंदर्यावर तो सारखी नजर फिरवत होता. आणि तेवढ्यात ते एका डोंगराच्या माथ्यावर पोहचले. समोर पाहतात तर दूरदूर पर्यंत नुसती हिरवी चादर त्यांना दिसत होती. सगळे समोर पाहून कुजबुज करत होते. किती सुंदर आहे हे एकमेकांना सांगत होते.

“मित्रानो !! आयुष्यात सुंदर आठवणी गोळा करायला सुरुवात केली ना !! की केव्हा आपण वाईट आठवांच गाठोड फेकून देतो आपल्याला कळतही नाही !! आजपासून आपण तेच करायच !! सुंदर आठवणी गोळा करायला सुरुवात करायची. आणि निसर्गा इतकी सुंदर आठवण तुम्हाला कधीच कुठे भेटणार नाही. पहा समोरच्या त्या लांब टेकडीच्या पायथ्याशी इवलंसं गाव दिसतंय ना ??”
सगळे एका सुरात हो म्हणाले.
“विचार करा !! आत्ता तिथली माणसे काय करत असतील !! कोण असतील !! देवाने मला हा क्षण इथे दिलाय !! तिथल्या किती लोकांना त्या गावात तो क्षण मिळाला असेल !! ” कर्णिक हे सांगत असताना सूर्य अस्ताला जात होता.
“पाहा !! थोड्या वेळाने त्या गावचे दिवे लुकलुकत आपल्याला त्यांच्याकडे पाहायला लावतील ! मनात त्या गावच चित्र आणा आणि विचार करा तुम्ही तिथे असतात तर ??”
आकाश डोळे बंद करुन विचार करू लागतो. त्याला समोर एका छोट्या घरात आपले आई बाबा ,आपले सवंगडी दिसतात. ते सगळं इमॅजिन करून गालातल्या गालात तो हसतो. आणि डोळे उघडतो.

“किती सुंदर आहे ना हे जग !! बघा तो सूर्य अस्ताला जातोय आणि आता ते लुकलुकनारे गावचे दिवे आपल्याला जणू तिकडे येण्यासाठी खुणावत आहेत !! हातात कोणतं प्येय नको ! ना नको तो सिगरेटचा वास !! कारण शुद्धीत राहून या जगाकडे पाहण्याची जी मजा आहे ना !! ती या वर्तुळात अडकून पडण्यासाठी नाही रे !!! आता हा सूर्यास्त मनात साठवून ठेवा !! ” कर्णिक सूर्याकडे बघत बोलता बोलता थांबले.

आकाश आणि बाकी सगळे मित्र तिथे कित्येक वेळ तो सूर्यास्त पाहत बसले. त्यानंतर ते संस्थेच्या ऑफिसवर निघाले. यादरम्यान सर्वांची एकमेकांशी ओळख झाली.
“नमस्कार !! मी आकाश देशपांडे !! “
“नमस्कार !! मी निशा बर्वे !! ” कित्येक वेळ सोबत असलेली ती अखेर तीने त्याला नाव सांगितले.
“तु इथे ??”
“पुण्याहून आले मी !! तारुण्याच्या उंबरठ्यावर खूप चुका करायला लागले होते मी !! सिगरेट, ड्रिंक्स ,सेक्स अश्या नको त्या नादी लागतं चालले होते. एकदिवस कर्णिक दादांच लेक्चर ऐकलं !! माझ्या मला चुका कळतं गेल्या आणि अखेर इथे आले!! दादांनी मला सांभाळून घेतलं ! कित्येक चुकीच्या गोष्टीतून बाहेर काढलं !!”
आकाश क्षणभर काहीच बोलला नाही.
“सेक्स?? त्यात काय वाईट ??” त्याने मनातल्या मनात विचार केला.
“तू ही विचारात पडलास ना की किती वाईट होते मी ??”
“नाही नाही नाही !! मला अस काही वाटलं नाही !!”

आकाश संस्थेच्या त्या वाड्यात आला. सगळे आपापल्या घरी निघून गेले. काही मित्र तिथेच कर्णिक यांच्या सोबतच राहत होते. कर्णिक यांनी आकाशला पाहिलं आणि त्यांनी त्याला जवळ बोलावून घेतल,
“काय मग आकाश ?? आज कस वाटलं आपलं फिरणं ??”
“खूप छान !! मनाला खूप मस्त वाटलं !! आज कित्येक दिवसांनी मी कुठेतरी वेगळ्या ठिकाणी गेलो होतो. वेगळ्या पद्धतीने विचार करत होतो. “
“होना ?? मग आता नेहमी आमच्या सोबत यायचं !! आपल्या सारख्या या वर्तुळात अडकलेल्या मित्रांना बाहेर काढायचं !! आणि असही तुझी ही सुरुवात आहे !! अजून खूप अनुभव तुला यायचे आहेत !!”
” मग मी पुन्हा केव्हा येऊ ??”
“उद्या जमेल ?? उद्या आम्ही पुन्हा भटकंती करायला जाणार आहोत !!”
“हो चालेल !! येईल मी नक्की !!”
“पण कॉलेज क्लास करून ये बर !! आपण दुपारी तीनला निघणार आहोत !!”
“हो चालेल !!”

आकाश वाड्यातून बाहेर पडतो. चालत आपल्या हॉस्टेलवर जायला निघतो. तेवढ्यात निशा बाईक घेऊन त्याच्या समोर येते आणि म्हणते,
“सोडू का तुला मी ??”
“नाही नको जाईन मी !!”
“चल रे !! सोडते मी !!”
“पण तुला ??”
“मीही इथे हॉस्टेलवर राहते!! गर्ल्स हॉस्टेल आहे आमचं !! आपल्या संस्थेशी जोडून राहावं म्हणून इथेच एडमिशन घेतलंय !! गर्ल्स कॉलेजला !! “
“ओके !!”

निशासोबत आकाश त्याच्या हॉस्टेल समोर आला, तिच्या सोबत थोडा वेळ गप्पा मारत राहिला. आणि उद्या पुन्हा भेटू अस म्हणत ती बाईकवर निघून गेली. आकाश कित्येक वेळ तिला जाताना पाहत राहिला.

क्रमशः

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *