वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||

भाग १४

भेट

पाहता पाहता आकाश आता नव्या मित्रात, नव्या वातावरणात मिसळून गेला. आपल्या जुन्या गोष्टी विसरून नव्या जगात गेला. या जगात तो अजुन नव्या वर्तुळात अडकत गेला, मित्रांच्या संगतीने आणि खिशातील बाबांनी पाठवलेल्या पैशाच्या जोरावर तो आता सिगरेट ओढू लागला, दारू पिऊ लागला. दिवसा मागून दिवस असेच वाया घालू लागला. मिळेल त्या एकांतात हस्तमैथून करू लागला. या सगळ्या गोष्टी मध्ये त्याची तब्येत आता खालावली होती. खानावळीत जेवण,रात्रीच मित्रांसोबत गप्पा मारत जागरण आणि अभ्यास सोडून सगळं आयुष्य जगण्याची ओढ, यातून तो पुन्हा गर्ततेत अडकला. पहिल्या सेमीस्टर मध्ये तो नापास झाला. बाबांनी आईनी त्याला याबद्दल खूप सुनावलं. पण त्याच्यावर त्या बोलण्याचा काहीच परिणाम झाला नाही. आयुष्य आपलं अनमोल आहे हे तो विसरून गेला. कॉलेजच्या आवारात टवाळक्या करण्यात तो हरवून गेला. पण दोष मात्र आपल्या हरण्याचे दुसऱ्यांवर टाकत गेला.

“इतकं सगळं करूनही, मी अजूनही अयशस्वी का होत आहे माझंच मला कळत नाहीये !! आई बाबांचा तर विश्वासाचं माझ्यावरून उडून गेलाय. कोणत्या तोंडाने त्यांना बोलावं तेच कळत नाहीये. बारावीला झालेली चूक पुन्हा होऊ नये म्हणून मनापासून अभ्यास केला. पण इथेही तेच. पहिल्या सेमीस्टर मध्ये नापास झालो. नेमक माझं चुकतंय कुठ तेच मला कळतं नाहीये. वैताग आलाय नुसता. ” आकाश सिगरेट ओढत कित्येक विचार करत होता.

“ये आक्या !! चल पटकन !! कॉलेज मध्ये कोणीतरी गेस्ट आलाय !! लेक्चर आहे म्हणे !”
“तू जा रे !! मला नाही यायचं !! “
“सब्जेक्ट माहितेय का ?? “
“कोणता ??”
“पोर्न फिल्मस, ऑन स्क्रिन अँड रिॲलिटी !!”
“काय ?? कॉलेज मध्ये ?? बरं असल्या गोष्टीला परवानगी दिली प्रिन्सिपॉलने !!” आकाश हसत म्हणाला आणि सदानंद सोबत कॉलेजच्या हॉल मध्ये आला.

संपूर्ण कॉलेज त्यावेळी भरून गेल होत. त्यातील कित्येक विद्यार्थी फक्त मजा म्हणून आले होते. आकाश आणि सदानंद त्या गर्दीचा एक भाग झाले. तेवढ्यात सुरुवात झाली.

“हॅलो स्टुडंट्स !!! तुम्ही सगळे एवढ्या प्रचंड संख्येने इथे आलात त्याचाच खरतर आम्हाला आनंद आहे. या पुढच्या १ तासात तुमचं आयुष्य बदलून जाईल हे मात्र नक्की, तर मग सुरू करूयात, आणि यापुढे हा मंच संभाळतील “वर्तुळ ” या संघटनेचे संस्थापक अध्यक्ष, दिनेश कर्णिक. त्याच्या या संघटने विषयी मी सांगण्यापेक्षा तेच तुम्हाला चांगल्या प्रकारे सांगतील अस मला वाटत, तर सर्व आपण त्यांचं टाळ्यांच्या गजरात स्वागत करूयात.” कॉलेजचे प्रिन्सिपॉल एवढं बोलून आपल्या जागेवर बसले.
दिनेश कर्णिक माईक जवळ आले, क्षणभर शांत राहिले, आणि बोलू लागले,
“एवढा तरुणवर्ग पाहिला की खरंच खूप आनंद होतो आम्हाला आणि आमच्या संस्थेला ज्याच नाव आहे “वर्तुळ !!” बंधनातून स्वातंत्र्याकडे !! याला !!”
सगळे विद्यार्थी त्यांच्याकडे कुतूहलाने पाहत होते. आणि ते बोलत होते,
“खरतर तुमच्यातील कित्येक विद्यार्थी हे आजच्या या कार्यक्रमाचे शीर्षक बघून मजेशीर काहीतरी ऐकायला भेटेल अस समजून आले असतील !! पण माफ करा मित्रांनो अस काहीच होणार नाहीये !! आणि तो विचार जो तुम्हाला मजेशीर म्हणून इथपर्यंत घेऊन आला त्या पोर्न विरोधातच आम्हाला तुम्हा सर्वांना सावध करायचं आहे !! तुम्हाला त्यातून ओढून बाहेर काढायचं आहे. आमची ही संस्था हेच जागृतीच काम विविध शहरात जाऊन !! विविध युनिव्हर्सिटी मध्ये करते. खरतर आम्हाला कित्येक कॉलेजमध्ये असे लेक्चर घेण्यास परवानगीच मिळत नाही. त्यामुळे आम्ही कधी कधी असहाय होऊन इंटरनेटच्या जगात ऑनलाईन जनजागृतीच काम करतो. “

“यात काय आली जनजागृती ! ! याला काय माहिती पोर्न म्हणजे काय ते !! कसली मज्जा येते बघताना!!” आकाश मनातल्या मनात म्हणतो आणि गालातल्या गालात हसतो.
“काय झालं भाऊ आताच बघून आला ना ??” सदा मध्येच त्याला विचारतो.
“समोर बघ !! रात्री पाठवतो तुला !! नवीन आलाय आपल्या आवडत्या स्टारचा !!”

” पण आमचा शुद्ध हेतू या सगळ्यातून तुम्हाला बाहेर काढण्याचा आहे !! कोणी सिगरेट ओढतो त्याला त्याच व्यसन लागत , कोणी दारू पितो !! तसेच हे एकप्रकारे व्यसनच आहे !! यातून होत काय तर आपला बघण्याचा दृष्टिकोन बदलून जातो. आपल्या डोक्यात सतत तेच विचार यायला लागतात आणि आपण त्याच्या आहारी जातो. आणि एकदा या गोष्टीचा आहारी गेलो की आपण वास्तावापासून दूर एका आपणच आपल्यात शोधलेल्या खोट्या जगात राहायला लागतो. आणि मग पुढे हस्तमैथून , वैश्या गमन !! अश्या नको त्या मार्गाला जायला लागतो. खरतर आपणच आपल्या शरीराला कमकुवत करतो, भटकत जातो. आलेल्या अपयशाला सामोरे तर जातो पण त्याच महत्त्व , त्याचे कारण आपण कधीच पाहत नाही. कारण आपल्या डोक्याला सुखाची व्याख्या माहीत झालेली असते आणि ती म्हणजे या पोर्न मध्ये पाहणं. खरतर मित्रानो पोर्न इंडस्ट्री ही खूप मोठी इंडस्ट्री आहे. आणि तुम्ही त्याचे एक कस्टमर आहात !! म्हणून तुम्हाला हे सांगणं गरजेचं आहे !! कारण हे नुकतंच मिळालेल तरुणपण वाटत तितकं सुखद जरी असल तरी आजच्या होणाऱ्या चुका या भविष्यात त्याची किंमत पूर्ण करून घेतात, म्हणून हा सगळा खटाटोप !! कारण हल्ली, मोबाइलच्या एका क्लिकवर तुमच्या स्क्रीनवर सगळं उपलब्ध होत हे सगळं. पण लक्षात ठेवा तुमच्या नकळत तुम्ही या जगाच्या स्पर्धेतून बाद होत जाता. तुमच्या पैकी कित्येक मित्रांना खूप मोठं काहीतरी करायच आहे पण ते होत नाही त्याच कारण तुम्ही शोधलं पाहिजे . मी म्हणत नाही की पोर्न हेच एक कारण असू शकते !! अति मोबाईलचा वापर, चुकीचे मार्गदर्शन, प्रेमभंग असे कित्येक कारणे असू शकतात. “
आकाश आता मणलावून सगळं ऐकत होता. त्याला सगळं काही आपल्याच विषयी चालू आहे अस वाटत होत.

“वर्तुळ या आमच्या संघटने तर्फे आम्ही अश्या आमच्या मित्रांना !! या अश्या कित्येक व्यसनातून बाहेर काढण्याचा प्रयत्न करतो. खरतर बोलण्यासाठी खूप काही आहे !! पण आता विश्राम घेतो !! जाता जाता एक आमच्या संघटनेच पॉम्प्लेट तुम्हा सर्वांना देऊन जातोय. यामध्ये आमचा संपर्क क्रमांक, आमच्या संघटनेशी जोडण्यासाठी आपण त्याच्या वापर करू शकता. किंवा पत्ता ही आहे तुम्ही डायरेक्ट मला येऊन भेटु सुद्धा शकता. आपल्या संघटनेतर्फे आपण दर आठवड्याला रविवारी विविध कार्यक्रमाचे आयोजन करतो !! मला आशा आहे की आपल्यातील कित्येक विद्यार्थी नक्की आम्हाला येऊन भेटतील !!धन्यवाद !!”

लेक्चर संपताच हॉलच्या दरवजाताच शिपाई सर्वांना पॉम्पलेट देत होता. आकाश आणि सदानंद दोघेही ते पॉम्पलेट घेतात.
“हे !! काहीही काय !! बकवास बोलत होता तो कर्णिक का फरणिक !! काय तर व्यसन आहे पोर्न व्यसन !! भावा म्हणावं कधी ये आमच्याकडचे एचडी व्हिडिओ बघायला!! मग कळलं त्याला काय असतं ते !!” सदानंद हातातील पॉम्पलेट फाडत म्हणाला.
आकाश मात्र कित्येक वेळ त्या पॉम्पलेटला बघत बसला. त्याला पाहून सदानंद म्हणाला.
“ये भाऊ !! जायचा विचार तर नाहीना तुझा !! चल बाबा !! असल्याच्या नको नादी लागू!!”

आकाश हळूच तो कागद आपल्या खिशात ठेवतो. आणि सदानंद सोबत हॉस्टेलवर येतो.

रात्रभर तो कर्निकांच्या गोष्टीचा विचार करत बसतो. मोबाईल नंबर पाहतो. डायल करतो परत कट करतो.
“ते म्हणताय ते मला खरतर वाटतंय !! पण वाईट असत हे पाहणं तर आनंद भेटला नसता ना ?? काय वाईट?? काय चांगल?? काही कळत नाहीये मला !! त्यापेक्षा उद्या त्यांना डायरेक्ट जाऊन भेटलो तर !! पण नको !! कॉलेज मध्ये कळलं तर चेष्टा करतील सगळे !! नकोच ते !!”

रात्रभर आकाश या गोष्टीचा विचार करत बसला, त्या रात्री त्याने हस्तमैथुन केल नाही, ना पोर्न पाहिला नाही. तो फक्त विचार करत राहिला. आणि झोपी गेला.

क्रमशः