भाग १३
पुढचा मार्ग !!
सायली सोबत संबंध तोडल्या नंतर आकाश आता शांत झाला होता. कोणाशी जास्त बोलायचं नाही, कोणा मित्रात जास्त मिसळायचं नाही. जणू त्यानं स्वतःला स्वतःतच बंधिस्त करून घेतलं होतं. आत्ममग्न झालेला होता, जणू सुखही आपल्यात पाहत होता आणि दुःखही. या सगळ्या काळात त्याची एक सवय मात्र नेहमी त्याच्या सोबत होती. हस्तमैथून करण्याची. जणू आता त्याला त्यातच सुख सापडलं होत. मिळालेल्या मार्क्सना स्वीकारून त्याला पुढचा मार्ग पाहायचा होता. एक सकाळी बाबा त्याच्यासोबत परगावी आले, त्याच्या पदव्युत्तर शिक्षणासाठी प्रवेश घ्यायला.
अकरावीला ज्या आकाशचा नंबर पहिल्या यादीत लागला होता. त्या आकाशला आता एडमिशन मिळावे म्हणून वणवण भटकाव लागत होत.
“साहेब यापुढचा नंबर तुमचा आहे !!! प्रिन्सिपॉल साहेब आले आहेत !! “
कॉलेजमधला पिऊन म्हणाला.
“बरं ठीक आहे !!” बाबा स्वतःला सावरत म्हणाले.
थोडा वेळ गेला पुन्हा प्रिन्सिपॉल साहेबांच्या ऑफिसची बेल वाजली. पिऊनने त्यांना आत जाण्याचा इशारा केला.
“आत येऊ सर ??”
समोर बसलेले प्रिन्सिपॉल त्यांना येण्याचा इशारा करतात.
“बोला !! “
“माझ्या मुलाचं एडमिशन करायचं होत !!”
“यामध्ये मी आपली काय मदत करू शकतो ?? कारण कट ऑफ लिस्ट बाहेर लावली आहे!!”
“साहेब त्यात माझ्या मुलाचं नाव नाहीये !!”
“अच्छा !! बघू त्याचे मार्कशीट !!”
बाबा मार्कशीट देत म्हणाले.
“त्याला थोडे कमी मार्क्स आहेत त्यामुळे जरा !!”
बाबा बोलता बोलता थांबले प्रिन्सिपॉल साहेबांनी बाबांकडे पाहिलं.
“पंचावन्न टक्के मार्क्स आहेत हे !! बीएससीला आमचे कमीत कमी सत्तर टक्के राहतात. मेडिकल कॉलेज मध्ये एडमिशन मिळालं नाही म्हणून इकडे येणारे आम्ही घेतच नाही !! कारण कोणतीच डिग्री कमी किंवा जास्त अशी आम्ही मानतच नाही !! “
“माहिती आहे मला सर पण खूप आशेने मी आलोय !! “
“सॉरी साहेब पण मी काही करू शकत नाही !!” प्रिन्सिपॉल साहेबांनी मार्क्सशीट बाबांकडे देत म्हणाले.
बाबा क्षणभर शांत झाले पुन्हा त्यांनी आकाशला बाहेर जाण्यासाठी सांगितलं . आकाश बाहेर गेला. समोर अंधुक काच होती. त्यातून त्याला अस्पष्ट अस दिसत होत. बाबा जागेवर उभा राहिले. प्रिन्सिपॉल साहेबांकडे पाहत खाली वाकले. त्यांचे पाय पकडून बाबा बोलू लागले.
“साहेब !!कृपा करा पण माझ्या मुलाला तुमच्या कॉलेज मध्ये एडमिशन द्या !!”
प्रिन्सिपॉल साहेब जागेवरून उठले. मागे सरकले.
“आहों !! काय काय !! काय करताय काय तुम्ही !! उठा !! उठा !! समोर बसा बर तुम्ही!! “
बाबा समोरच्या खुर्चीवर बसले.
” हे अस नका करू साहेब , मलाही तुमचं दुःख कळतंय !! मीही एका मुलाचा बाप आहे !!”
“मग काय करू साहेब सांगा ना !! दहावीला वर्गात पहिला आलेला हा !! आज त्याची ही अवस्था पाहवत नाही !! तसा तो खुप हुषार आहे !! पण त्याला काय झालंय काही कळतं नाही !! “
“दहावीनंतर खूप पालकांची हीच तक्रार असते !! आपला पाल्य खूप हुशार आहे म्हणून ते लक्ष देत नाहीत !! आपणही शाळेतून बाहेर पडलो मुक्त झालो म्हणून हे पाल्य बेबंध वागतात !! आणि अगदी आयुष्याच्या वळणावर असलेल्या बारावीच्या परीक्षेत कमी मार्क्स मिळवतात !! “
“तरी मी त्याला काही कमी पडू दिलं नाहीये !! “
“हेच तर होत ना!! म्हणून तर त्यांना कशाची किंमत वाटतं नाही !! बरं ठीक आहे !! तुमच्याकडे पाहून मी त्याला एडमिशन देतोय !! पण त्याने अभ्यास नक्की केला पाहिजे!!”
“मी सांगतो ना !! तो नक्की करेन अभ्यास !!
“ठीक आहे ,आता या तुम्ही !! “
प्रिन्सिपॉल साहेबांनी समोर ठेवलेल्या एडमिशन फॉर्मवर सही केली. आणि आकाशच एडमिशन झालं. आपल्या घरापासून दूर ,परगावी.
बाबा बाहेर येताच आकाशने त्यांना विचारलं.
“काय म्हणाले !!”
“एडमिशन झालंय तुझं !!”
“वा !! ते तर होणारच होत!! दहावीचे मार्क्स काय कमी आहेत काय !!” आकाश क्षणात बोलून गेला.
बाबा क्षणभर त्याच्याकडे पाहत राहिले. पण ते त्याला काहीच म्हणाले नाही.
दोघे त्या संध्याकाळी पुन्हा आपल्या गावी परतले. बाबांनी घडलेली सगळी गोष्ट आईला सांगितली. आकाश आपल्या खोलीत जाऊन तयारी करू लागला, तेवढ्यात त्याचा फोन वाजला,
“हा बोल दिप्या !!”
“भाई !! इंजिनियरिंग कॉलेज मध्ये एडमिशन झालं तुझ्या भावाच !!”
“वाह !! अभिनंदन !!”
“तुझ काय ?? “
“नगरला बीससीला एडमिशन कन्फर्म झालंय !! “
“वाह !! तुझंही अभिनंदन !! “
“कसल अभिनंदन !! इथ थर्ड लागलाय सगळा !! जायचं होत एमबीबीएसला आणि आता करतोय काय तर !!जाऊ दे !! परवा निघतोय नगरला !!”
“परवा ?? लगेच !!”
“हो !! आता वैताग आलाय इथला !! “
“कळलय बर मला तुझ आणि सायलीच !! आधीच मला विचारलं असतस तर एवढा मुर्खात नसता निघालास !!”
“काय करावं आता !! आपलंच नशीब !! “
“नशीब बिशिप काही नाही चुत्या आहेस तू!! “
“खरंय भावा !! पण आता तिला विसरण खूप अवघड आहे मला !!”
“काय !! अरे दे विषय सोडून !! असल्या कितीही आल्या नी गेल्या !! “
“मनापासून प्रेम केलं होत रे !!”
“बरं बरं !! ते जाऊदे देवदास !! जायच्या आधी एकदा भेटायला या !! “
“नको रे !! मला खूप आवरा आवर करायची आहे !! “
“काय भाई !! हीच का तुझी दोस्ती !!”
आकाश पुढे काहीच बोलत नाही. फोन ठेवून देतो.
कोणाशीही काहीच जास्त न बोलता आकाश आवरू लागतो. त्याला कधी एकदा नगरला जाईल अस झालेलं होत. त्याच्या मनात कित्येक विचारांचं चक्र घोंगावत होत.
” आयुष्याच्या मुख्य वळणावर मी माती खाल्ली !! नको त्या लोकांच्या संगतीत राहिलो आणि स्वतःची अवस्था बेक्कार करून ठेवली. याला जबाबदार कोण ?? तेच ज्यांनी मला धोका दिला ,मला पावला पावलांवर अडवल !! ती सायली , ते कॉलेजचे शिक्षक अजून खूप आहेत !! त्या सायली सोबत तर मी एक्झाम वेळी सुद्धा बोलत बसलो !! माझी परवा केली नाही पण तिची काळजी केली मी !! वाटोळं करून घेतलं मी !! पण आता बास झालं !! अशा लोकांना आता माझ्या आयुष्यात अजिबात जागा नाही !! मी आता इथून निघून जातोय !! निघून जातोय !! कोणी नाहीये माझं इथे !! “
आकाश दोन तीन दिवसांनी नगरला जायला निघाला. आईच्या डोळ्यातील अश्रू थांबता थांबत नव्हते. बाबा त्याला सोडायला येणार होते.
“आई !! बस् आता !! पुढच्या महिन्यात येतोय मी !!”
“पहिल्यांदा घरापासून एवढं लांब राहणार आहेस !! काळजी घे पोरा !! “
“हो आई !! रडू नकोस आता !!”
बाबा आणि आकाश त्या संध्याकाळी नगरला पोहचले. बॉईज हॉस्टेलवर आकाशची राहायची सोय झाली होती. बाबांनी त्याची सगळी सोय व्यवस्थित आहे ते पाहून त्याला नीट राहण्याचा सल्ला दिला. अभ्यास कर !! म्हणून सांगितलं. आणि बाबा पुन्हा गावी परतले.
आकाश एकटाच बॉईज हॉस्टेलच्या खोलीत कित्येक वेळ पडून राहिला. समोर अजून दोन कॉट होते. त्यावर कोणाचं तरी सामान अस्ताव्यस्त पडलेल त्यानं पाहिलं. रात्री नवाच्या पुढे कोणीतरी जोरात खोलीचा दरवाजा उघडला, आकाश दचकला , समोर कोणीतरी आहे हे पाहून त्याच्याकडे पाहून हसला,
“ये !! हाय!! न्यू एडमिशन ??”
आकाशने होकारार्थी मान हलवली.
“मी सदानंद दाते !! बीएसस्सी सेकंड ईअर !!”
“मी आकाश देशपांडे !! मूळचा मी बार्शीचा आहे !!”
“अरे वां !! मस्तच !! लई भारी गाव आहे बार्शी तर !!”
आकाश फक्त त्याच्याकडे पाहत राहिला. सदानंदने खिशातील मोबाईल काढत फोन लावला,
“ये गंग्या !! भावा आपल्या खोलीत न्यू एडमिशन आलाय !! ये पटकन ये !!”
सदानंदने फोन ठेवला. आणि कित्येक वेळ आपल्या कामात व्यस्त राहिला. समोरून पुन्हा कोणीतरी आतमध्ये आले,
“न्यू एडमिशन ??”
आकाश फक्त त्यांना होकारार्थी मान हलवत असे. अश्यात रात्रीचे बारा वाजले. आकाश हॉस्टेलच्या मेसवर जेवण करून येतो. तिथेही त्याला सतत तोच प्रश्न विचारला जात असे. “न्यू एडमिशन ??” आकाश फक्त मान हलवत असे.
रात्रीच्या एक दीडच्या सुमारास आकाश आणि सदानंद झोपलेले असताना कोणतरी हळूच आकाशच्या जवळ येऊन त्याला उठवू लागलं.
आकाश दचकून जागा होतो. समोर कोणीतरी अनोळखी व्यक्ती पाहून घाबरतो.
“आकाश ??”
“हो !!”
“न्यू एडमिशन ??”
आकाश पुन्हा मान होकारार्थी हलवतो.
“आता तुझं काही खर नाही!!” आणि तो जोरजोरात हसू लागतो.
“ये गंग्या उगाच नको भीती घालू रे पोराला !! मुतल ते चड्डीत !!” सदानंद खोलीची लाईट लावत म्हणाला.
गंग्या जोरजोरात हसू लागला.
“अरे भावा !! नव्या दोस्त लोकांचं स्वागत तरी करू दे की मला !!”
” हे अस !! पोरगं मरल की!!”
“ये आपूनका स्टाईल आहे !! बरं भावा माझं नाव गणेश देशमुख !! सगळे दोस्त आपल्याला गंग्या म्हणतात !! “
आकाश डोक्यावरचा घाम पुसत त्याच्याकडे बघून हसतो.
आकाशच्या आयुष्यात पुन्हा नवे वळण येते. त्याला आता आई बाबांपासून दूर राहावं लागतं होत. त्याच्या नव्या आयुष्याला सुरुवात झाली होती. नवे मित्र , नवे शहर आणि नवे ध्येय त्याच्या सोबत होते.