Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » कथा

वर्तुळ || कथा भाग १२ || वास्तवाशी सामना ||

Category कथा
वर्तुळ || कथा भाग १२ || वास्तवाशी सामना ||

Content

  • भाग १२
  • क्रमशः
Share This:

भाग १२

वास्तवाशी सामना

“मला वाटलं होत आपण खूप चांगले मित्र आहोत !! म्हणूनच तर मी तुला माझ्या आयुष्यातील प्रत्येक गोष्ट सांगत होते !! एक चांगला मित्र म्हणून मी तुझ्यावर विश्वास ठेवत होते!! पण आजच तुझं बोलणं मला नाही आवडलं !!”
सायलीचा मेसेज पाहताच आकाशला तिच्या या बोलण्याचा भयंकर राग आला, आधीच उद्याच्या रिझल्टच टेन्शन आणि त्यातून सायलीने त्याला दिलेले दुःख यातून तो सावरू शकत नव्हता,
“चांगला मित्र म्हणत असतीस तर माझ्यापासून काही लपवलं नसतं तू !! मीही मूर्ख तुझ्या प्रेमात पडलो !! मला वाटलं ही सायली फक्त माझी आहे !! माझ्यासाठी वेळ काढते !! माझ्यासाठी, माझ्या काळजीपोटी मला बोलते ,मेसेज करते !!”
सायली आकाशचा मेसेज वाचून कित्येक वेळ त्याला रिप्लाय करतच नाही, तिला मनातुन कळून चुकल होत की आकाशला आपल्या प्रेमाबद्दल कळलं आहे. पण ती कळूनही न कळल्या सारखे करत होती.
“बाकी काही बोलू नकोस !! तुझ माझ्यावर प्रेम आहे की नाही ते सांग ??” आकाश तिला पुन्हा विचारतो.
“आकाश अरे !! आपण खूप चांगले मित्र आहोत रे !!”
“मित्र ?? सगळ्यांपासून चोरून मला भेटायचं !! आपल्याबद्दल कोणाला काही बोलायचं नाही !! सकाळपासून रात्रीपर्यंत फक्त बोलत राहायचं !! नाही बोललो तर राग येतो !! नाही भेटलो तर राग येतो ! प्रत्येक सेकंदाला मिस यू पाठवायच !! आणि आपण फक्त मित्र ??”
“पण मी कधी म्हणाले का तुला माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून ??”
आकाश पुढे काही बोललाच नाही. थोड्या वेळाने सायलीचा पुन्हा मेसेज आला.
“आपल्या मैत्रीचा चुकीचा अर्थ काढलास तू !!!”
आकाशने मेसेज पाहताच रिप्लाय केला.
“हो नक्कीच !! पण ज्याच्यावर तू मनापासुन प्रेम करते आहेस त्यालातरी सगळं खर खर सांग !!! अस माझ्या सारखं अंधारात ठेऊ नकोस त्याला !!”

आकाश आणि सायली रात्रभर चॅटिंगवर बोलत राहतात. सकाळ होते आई बाबा त्याला उठवायला येतात. तरीही तो खोलीतून बाहेर येत नाही. त्याचा राग काही केल्या शांत होत नाही. आपल्याला सायलीने फसवल एवढंच त्याच्या डोक्यात फिरत होत. त्यामध्ये तो आज आपला रिझल्ट आहे हेही विसरून गेला होता. कित्येक वेळ तो आपल्या खोलीतून बाहेरचं आला नाही.

थोड्या वेळाने त्याच्या खोलीचा दरवाजा आईने ठोठावला. पटकन त्याने दरवाजा उघडला, दरवाजा उघडताच जोरात त्याच्या गालावर चपराक बसली, क्षणभर तो सुन्न झाला, समोर आईला पाहून म्हणाला,
“काय झालंय आई ??”
“काय झालंय ! लाज कशी वाटत नाही तुला विचारायला !! काय कमी केल होत तुला, म्हणून तू असे आमचे पांग फेडले !!”
“काय ??” आकाश पुन्हा पुन्हा आईला विचारतो.
“रिझल्ट लागलाय तुझा हे तरी माहिती आहे का ?? पंचावन्न टक्के पडलेत फक्त तुला !! “

आईच्या तोंडून रिझल्ट ऐकताच आकाश सुन्न झाला. पलंगावर मटकन बसला. त्याला आईला काय बोलावं काहीच कळलं नाही. पुन्हा सावरत त्याने आईला विचारलं,
“कोणी सांगितलंय तुला हे !! माझा नसेल हा रिझल्ट !!”
“बाबांनी पाहिलाय !! लाज वाटली त्यांना सगळ्या ऑफिस मध्ये तुझी !! काय कमी केल आम्ही तुला , न मागता मोबाईल दिला, तुझ्यासाठी वेगळी खोली दिली, का ?? तर साहेबाना शांत अभ्यास करता यावा म्हणून !! पण तू काय केलंस ?? सगळ्या स्वप्नावर पाणी फिरवलस तू !! “
आकाश आईच बोलणं गप्प बसून ऐकत होता. पुन्हा पटकन उठला मोबाईल हातात घेऊन रिझल्ट पाहू लागला.
“गेली तीन ते चार वर्ष झाली !! मी आणि तुझ्या बाबांनी पै न पै गोळा केले !! तुझ्या भविष्यासाठी !! बाबांना मिळालेला बोनस त्यांनी तसाच जपून ठेवला!! तुझ्या भविष्यासाठी !! मित्र म्हणत असतील तुला !! खूप श्रीमंत आहेस तू म्हणून , पण त्यांनी तुझ्या बाबांच्या पायातली फाटकी चप्पल कधी पाहिली नसेल. कशासाठी ती फाटकी, तर तुला काही कमी पडू नये यासाठीच !! फसवलस तू आम्हाला आकाश !! फसवलस !!”
आई भरल्या डोळ्यांनी खोलीतून निघून गेली. आकाश मात्र सुन्न होऊन पलंगावर पडून राहिला. त्याचा वास्तवाशी सामना झाला होता. हेच खरे सत्य होते. मोबाइलच्या खोट्या जगात, नग्न स्त्रियांच्या फोटो असलेल्या जगात, पोर्न व्हिडिओज मध्ये , आणि सतत हस्तमैथुन मध्ये त्याला हे सत्य कधीच दिसलं नाही. पण तरीही तो या सगळ्या गोष्टींना दोष देतच नव्हता. कारण लागलेल्या व्यसनापासून त्याला दूर जायच नव्हत. कितीही हे वास्तव प्रखर असल तरी त्याला ते खोटं जगच आवडू लागलं होत.

पुन्हा आकाशने हस्तमैथुन केल. क्षणभर सुखासाठी या वास्तवाला विसरण्यासाठी तो त्यात आनंद शोधत राहिला. पण परोमाच्च आनंद मिळाल्या नंतर पुन्हा तो तिथेच आला जिथे त्याचा वास्तवाशी सामना झाला होता.

तो संपूर्ण दिवस आकाश खोलीतून बाहेर आलाच नाही. कोणत्या तोंडाने आपण बाबांशी बोलावं हाच त्याला प्रश्न पडला होता. ज्या बाबांनी त्याला सांभाळून घेतलं, वेळोवेळी त्याची पाठराखणं केली त्या बाबांसमोर आता कसं जावं हाच त्याला प्रश्न पडला होता.
त्या रात्री उशिरा बाबा घरी आले. त्यांना पाहताच आईच्या डोळ्यात पाणी आले, तिला पाहून ते लगेच म्हणाले,
“साधना !! रडू नकोस !! एवढं काही झालं नाहीये !!”
“काहीच झालं नाही?? आहो नापास झाला असता तरी चाललं असतं हो आपल्याला !! पण हे अस पास होन ??”
“प्रत्येकवेळी आयुष्यात यश येईलच असं थोडीच असत !!” बाबा आईला सावरत म्हणाले.
“हो पण हा त्याच्या आयुष्याच्या टर्निंग पॉइंट !! आणि त्याने नेमकी आत्ताच कच खाल्ली !! इतका हुशार तो !! काय झालंय त्याला ??”
“साधना !! कधी कधी प्रवाहात पडतो मागे माणूस ! !! “
“तुम्ही मला नका सांगू ,पण तुमच्याही डोळयात मला स्पष्ट दिसते आहे नाराजी , आपलं स्वप्न भंग झाल्याचं दुःख !!”
“दुःख तर आहेच साधना !! पण रागावून सत्य बदलणार आहे का ??”
“हो पण मग व्यक्तही व्हायचं नाही का ??”
” नक्की हो !! पण उगाच स्वतःला त्रास करून घेऊ नकोस !!”
बाबा आईला जवळ घेत म्हणाले. नकळत त्यांच्याही डोळ्यातून एक अश्रू ओघळला पण त्यांनी तो आईला कळण्याच्या आत पुसला. त्यानंतर त्यांनी आपलं मन खंबीर केल. कित्येक वेळ आईला बोलत बसले.
“मगाशी रागाच्या भरात मी त्याला थोबाडीत मारली !! “
“तूपण ना साधना !!! “
“सकाळपासून जेवायला पण नाही आला तो !!” आई डोळे पुसत म्हणाली.
“काय ??” बाबांनी आश्चर्याने विचारल.
सकाळपासून आकाश जेवलाही नाही हे कळताच बाबा तडक त्याच्या खोलीत गेले, समोर बाबांना पाहून आकाश पटकन उठला. बाबांच्या डोळ्यात पहायची सुद्धा त्याला हिम्मत होत नव्हती.
“काय रे ! सकाळपासून जेवणं केल नाहीस ते ??”
“भूक नाहीये !! ” आकाश तुटक बोलला.
“का भूक नाहीये ?? चल पटकन जेवायला !! आईच्या बोलण्याच एवढं काय मनाला लावून घ्यायचं !! तुझ्या काळजीपोटी बोलली ती !!”
“तस काही नाहीये बाबा !! “
“मग कस आहे?? उगाच काही कारण सांगू नकोस चल जेवायला !! मी फ्रेश होऊन आलो मग बसू आपण जेवायला !!”
बाबा खोलीतून बाहेर गेले. आकाश मात्र तसाच बसून राहिला, विचार करत,

“डॉक्टर व्हायचं होत मला !! आता हे मार्क्स बघून कोणी कंपाऊंडर म्हणून तरी घेईल का ही शंका वाटायला लागली आहे !! डॉक्टर होन या आयुष्यात शक्य नाही !! अभ्यास न करून मी माझ्या आयुष्याची माती केलीये एवढं मात्र नक्की आहे !! माझ्या आईचं , माझ्या बाबांचं मी स्वप्न मोडल हे सर्वात जास्त मला माझ्या आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत लक्षात राहील, त्याच दुःख माझ्या प्रत्येक क्षणात मला सलत राहील. हे दुःख आयुष्यभर माझी साथ देईल !!”
आकाश आपल्या मनात कित्येक गोष्टी साठवू लागला.
“आकाश !! चल जेवायला !! ” बाबा पुन्हा आकाशला बोलवायला आले.
जड पावलांनी तो डायनिंग टेबलवर जाऊन बसला. समोर बसलेल्या आई बाबांपासून आपली नजर चोरत तो जेवत होता. बाबांच्या हे लक्षात आलं,
“आकाश !! झालं गेलं आता सगळं विसरून जायचं !! नव्यानं सुरुवात करायची !! “
आकाश काहीच बोलत नाही.
“ठीक आहे डॉक्टर नाही होता आल तर काय झालं !! जगात कित्येक अश्या गोष्टी आहेत त्या तू करू शकतो !!”
“पण बाबा हे असले मार्क्स पाहून कोण मला एडमिशन देईल ??”
आकाशच्या डोळ्यात नकळत पाणी आले.
“अरे !! अस थोडीच आहे !! मिळेल एडमिशन !! नकोस चिंता करू !! ” मध्येच आई त्याला बोलते.
आईच्या या वाक्याने आकाशला क्षणभर का होईना बर वाटलं.
“आता हा विषय बंद करा !! जे आहे ते मान्य करा !! आकाश आता तुझ्या हातात आहे !! तुला भविष्यात काय करायचं ते !! आता तू ते ठरव !!! “

आई बाबांच्या या बोलण्याने आकाशला मनातून थोडा आधार वाटला. आपण चुकलो याची त्याला जाणीव झाली. खोलीतल्या पुस्तकांना पाहताना त्याच्या मनात कित्येक विचार येत राहिले आणि तेवढ्यात मेसेज आला,
“तुला वाटते तशी मी नाहीये रे आकाश !!”
आकाश मेसेज वाचताच मनात एक निर्धार करतो आणि रिप्लाय करतो,
“आयुष्यात खूप माणसे नकळत आपल्या जवळ येतात ! त्यातीलच माझ्या आयुष्यात आलेली तू एक !! पण आता मला विसरून जा सायली !! मी तुझ्यासाठी मेलोय अस समज !! आपण दोघे यापुढे कधीही नाही बोललो तर तेच उत्तम आहे !!”
आकाश सायलीला मेसेज करताच , त्यानंतर तिचा नंबर डिलीट करतो. मोबाईल बाजूला ठेवून देतो आणि पलंगावर पडताच झोपी जातो, पुन्हा नव्या आयुष्याच्या मार्गावर जाण्यासाठी.

क्रमशः

वर्तुळ || कथा भाग ११ ||
वर्तुळ || कथा भाग १३ ||

Yogesh Khajandar

Author || Content Writer || Blogger ||

Tags आई मुलगा कथा आई वडिलां विषयी कथा नवीन मराठी सेक्स कथा marathi hot story Marathi Katha

RECENTLY ADDED

वर्तुळ || कथा भाग १७ || पुढचा प्रवास || शेवट भाग ||
वर्तुळ || कथा भाग १७ || पुढचा प्रवास || शेवट भाग ||
वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
वर्तुळ || कथा भाग १६ || खरं प्रेम ||
वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||
वर्तुळ || कथा भाग १५ || संगत ||
वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||
वर्तुळ || कथा भाग १४ || भेट ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

man couple love people

तुला लिहिताना || Tula Lihitana || Marathi Poem ||

पानांवर तुला लिहिताना कित्येक वेळा तुझी आठवण येते कधी ओठांवर ते हसु असतं आणि मनामध्ये तुझे चित्र येते कधी शब्दात शोधताना पुन्हा उगाच तुझ्याकडे येते भावना ती तुझीच असते कविता होऊन माझ्याकडे येते
Dinvishesh

दिनविशेष १३ मार्च || Dinvishesh 13 March ||

१. चेस्टर ग्रीनवुड यांनी इअरमफचे पेटंट केले. (१८७७) २. अमेरिकेने भौतिकदृष्ट्या आपल्या स्थानावर असलेल्या प्रमाणित वेळेला (Standard Time) मान्यता दिली. (१८८४) ३. विल्यम हर्षेल या खगोलशास्त्रज्ञांनी युरेनसचा शोध लावला. (१७८१) ४. इंडोनेशिया आणि नेदरलँड यांनी आपले राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले. (१९६३) ५. अर्जुन पुरस्कार देण्याची सुरुवात झाली. (१९६३)
couple

हो ना || HO NA || MARATHI LOVE POEMS ||

"गोष्ट फक्त एवढीच होती मला समजून सांगायचे होते आणि तुला समजून घ्यायचे न्हवते
woman looking at hot air balloons

खुदसे यु कहता यही || HINDI || POEMS ||

खुदसे यु कहता यही राह से भटके नही पाप को पुण्य से परास्त होना यही समय के चक्र में दौडती ये जिंदगी भटके रास्तों पर मंजीले मिलती नहीं
श्रीगोपालद्वादशनाम स्तोत्रम् || Devotional ||

श्रीगोपालद्वादशनाम स्तोत्रम् || Devotional ||

शृणुध्वं मुनयः सर्वे गोपालस्य महात्मनः । अनंतस्याप्रमेयस्य नामद्वादशं स्तवम् ॥ १ ॥ अर्जुनाय पुरा गीतं गोपालेन महात्मनः । द्वारकायां प्रार्थयते यशोदायाश्र्च संनिधौ ॥ २ ॥

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest