वचन.. ! || VACHAN MARATHI KAVITA ||

Share This
"वचन दिलं होतं नजरेस
 फक्त तुलाच साठवण्याचं
 तुझ्या सवे आठवणींचा
 पुन्हा ती स्वप्ने पहाण्याच
 मिटलेल्या डोळ्यातही
 ह्रदयात तुला ठेवण्याचं
 तुझ्या आठवणीत
 अश्रुना त्या सावरण्याचं!!

 वचनं दिलं होतं त्या श्वासासही
 फक्त तुझ्यासाठी जगायचं
 प्रत्येक क्षणात जणु
 तुला नव्याने प्रेम करायचं
 तु नसताना ह्रदयात या
 श्वासात तुला जपायचं
 प्रत्येक श्वासावर फक्त
 तुझचं नावं द्यायचं!!

 वचन दिलं होतं तुलाही मी
 तुझा हात कधी न सोडायचं
 तुझ्या सोबत चालताना
 शेवट पर्यंत चालायचं
 येईल कोणतं ही संकट
 तुझ्या सोबत रहायचं
 नजरेत तुझ्या स्वतःस पहातं
 श्वास तुझा व्हायचं
 वचन दिलं होतं मी … !!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Next Post

तुझ्या मिठीत || TUJHYA MITHIT ||

Sat Feb 11 , 2017
ती तुझी मिठी मला खुप काही बोलायची मी आनंदात असताना जवळ मला घ्यायची कधी खुप दुर असताना ओढ मला लावायची आणि जवळ येताच अश्रुनांही विसरुन जायची