"न राहुन पुन्हा पुन्हा
 मी तुला पाहिलं होतं!!
 लपुन छपुन चोरुन ही
 मनात तुला साठवलं होतं!!

 कधी तुझ हास्य
 डोळ्यांत मी भरलं होतं!!
 कधी तुझ्या अश्रु मधलं
 दुख मी जाणलं होतं!!

 तु न दिसता कुठेच
 मन हे बैचेन झालं होतं!!
 तुला शोधत शोधत ही
 दुरवर जाऊन आलं होतं!!

 प्रेम तुझ्यावर करताना
 तुझ्या पासुन लपवलं होतं!!
 आठवणीत तुला लिहिताना
 शब्दात ते मांडलं होतं!!

 कधी तुझी वाट पहाताना
 वाटांवर भरकटलं होतं!!
 तुझ्या विरहात ही
 मन खुप रडलं होतं!!

 पहायच तुला पुन्हा पुन्हा
 मन हे बोलतं होतं!!
 आणि लपुन छपुन चोरुन ही
 मनात तुला साठवतं होतं!!"
 योगेश 

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE