“कोण आहे?”
“दादा मीच आहे!!”
“का रे सदा? काय काम काढलं सकाळ सकाळ?”
“पत्र द्यायच होतं तुमचं, कालच पोस्टमन देऊन गेलाय माझ्याकडे! “
“बर बर दे इकडे! ! “
“दादा कोणाच आहे हो पत्र?”
“आहे नातेवाईकाच आपल्याच!” दादा सहज म्हणुन गेले.
“काय रे सदा, आजोबा झालास म्हणुन कळालं ?”
“होय दादा, सुनेला पोरगी झाली !! मागल्या पोर्णिमेला!!”
“भाग्यवान आहेस रे!! दादा पत्राकडे बघुन म्हणाले !!”
“नातवांच्या गोंधळात घर नुसतं आनंदान नाचतंय बघा !! बर येऊ का!! पोराला रानात घेऊन जायचंय?”
“बर बर ये!!” दादांच हास्य पत्राकडे बघत विरुन गेलं.
  पत्र उघडत दादा पत्रातील मजकुर वाचु लागेल.
” तीर्थरूप बाबांस , बाबा इकडे आम्ही सर्व ठिक आहोत. मागच्याच महिन्यात शैलाला मुलगा झाला. तुम्ही आजोबा झालात!’
दोन चार ओळी वाचुन होताच.
” बाबा तुम्ही इकडे येऊ नका, काही गरज लागल्यास पत्राने कळवा! तुमची गैरसोय होईल! बाकी विशेष काही नाही.  तुमचाच सुहास!!”
  पत्राकडे बघत दादा तसेच उभे होते. ते एकट घर त्यांना अगदी खायला उठलं होतं.
“आपण आजोबा झालोत याचा आनंद तरी कसा मानावा रे!!” दादा मनातंच बडबडले.
“ते तान्हं बाळ मला पाहायचंय!!  बाबा तुम्ही इकडे येऊ नका! म्हणारा माझ्या मुलाला काय सांगु!! तुला लाहणाच मोठं करताना किती त्रास झाला होता !! तुला शिकवुन मोठं करुन हेच ऐकण्या साठी की बाबा तुम्ही इकडे येऊ नका!!”
  दादांच्या डोळ्यातील दोन आसवे त्या पत्रातील अक्षरांवर पडली. ती जनु त्या अक्षरांना पुसत होती. दादांच दुख हलक करत होती. तो सदा त्याच कुटुंब अडाणी होतं पण नात्यांमधे ते आपल्या ही पुढे खुप काही शिकलं होतं. त्याच घर नातवांनी नुसत गोंधळ घालत होतं आणि माझ घर माझ्या एकटेपणा वर नुसतं हसतं होतं. दोनंच खोल्यांच घर होतं सदाच, पण नात्यातील मोठेपणा त्या घरालाही राजमहाल करत होतं. दोन पैसे मिळवुन त्यांच कुटुंब आनंदात राहात होतं. दादांनी पत्र तसंच ठेवुन दिलं. तडक चालत चालत ते घरा बाहेर पडले. 
 “सदा!!”
“कोण आहे!!” सदा घरातुन बाहेर येतं म्हणाला.”
दादा तुम्ही !! माझ्या गरिबांच्या घरात! ! “
“सदा!! तुझ्या नातीला भेटायला आलोय मी!!”
“दादा माझं भाग्यच म्हणायचं हे!!! या बसा ना!!”
  सदा आतं गेला. थोड्याच वेळात तो एक गोंडस बाळ आपल्या हातात घेऊन आला. हलकेच ते दादांच्या हातात त्यानं दिलं. ते बाळ दादांकडे कुतूहलाने पाहु लागलं. दादांच्या गळ्यातील रुद्राक्षाच्या माळे सोबत खेळु लागलं. दादाची नजर त्या बाळावरुन हटेच ना. जनु ती त्यांना बोलतंच आहे. दादा तुम्ही ही माझे आजोबाच आहात असच जनु सांगत आहे! 
“सदा!! नाव काय ठेवलंस रे पोरीचं!!”
“लक्ष्मी! !!” सदा ने दादांकडे पहातं सांगितलं.
खुप वेळ गप्पा मारल्या नंतर. लक्ष्मी सोबत बोलल्या नंतर दादा परत घरी जायला निघाले. मनात एकच होतं ..
“लक्ष्मी! ! कुटुंबाला एक करणारी लक्ष्मी!! दोनच क्षणात आपलंस मला करणारी लक्ष्मी! !  त्या छोट्या घरात आनंदाने राहणारी लक्ष्मी!! गरिबीतही आनंद देणारी लक्ष्मी! ! नात्याना जोडणारी लक्ष्मी!! दादा लक्ष्मीच्या भेटीने आनंदुन गेले. क्षणासाठी का होईना आपलं दुःख विसरुन गेले. आपलंस करत ते तान्हं बाळ दादांना अश्रुतही हसवुन गेलं … 

THE END

✍️योगेश

SHARE