राहून गेले काही || MARATHI LOVE POEMS ||

राहून जातंय काहीतरी म्हणून
  मागे वळून पहायचं नसतं!!
  शोधून पाहिलं तरी तिथे तेव्हा
  आठवणीच्या पावला शिवाय काही नसतं!!

 मन ऐकणार नाही हे माहित असतं
  पुन्हा पुन्हा ते तिथे जातही असत!!
  पण त्या वेड्या मनाला सांगूनही
  कळूनही काही कळत नसतं!!

 कारण काहीतरी पहायचं असतं
  सावल्यातील चेहऱ्याला ओळखायचं असतं!!
  हरवून गेलेल्या क्षणांना शोधताना
  उगाच स्वतःही हरावयच  नसतं!!

 तिथे अबोल कोणी सापडत ही असतं
  त्याला उगाच बोलायच असत!!
  विसरून गेलेल्या नात्याला तेव्हा
  उगाच आसावत पहायचं नसतं!!

 कुठे दुःख मिळालं तर कुठ सुख ही असतं
  कधी हसू तर कधी रडु ही असतं!!
  काही सुटलं हातातून तर काही मिळालं जेव्हा
  हिशोब आयुष्याचा करताना हे पहायचं नसतं!!

 शेवटी उरले काय पाहत असतं
  मन वेड फिरत असतं !!
  फिरून फिरून थकलेल्या मनाला
  आठवणीच्या पावला शिवाय काही मिळत नसतं!!

  -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *