दिनांक २८ फेब्रुवारी हा राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून सर्व भारतात साजरा केला जातो. जगप्रसिद्ध डॉक्टर सी. व्ही. रामन यांचा लेख ‘नेचर’ या मासिकाला पाठवला आणि त्याला नोबेल पारितोषिक मिळाले आणि तो दिवस राष्ट्रीय विज्ञान दिवस म्हणून साजरा केला जाऊ लागला. डॉ. सी. व्हीं. रामन यांना १९५४ मध्ये भारतरत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात आले. विज्ञानात भौतिकशास्त्र या विषयात नोबेल पारितोषिक मिळवणारे ते एकमेव भारतीय ठरले.  येणाऱ्या पिढीस विज्ञानाची गोडी लागावी हा यामागचा उद्देश. डॉ. वसंत गोवारीकर यांनी या दिवसाची सुरुवात करण्यात महत्त्वाचे योगदान दिले.

चन्द्रशेखर वेंकटरमन
SHARE