स्वामी विवेकानंद यांचा जन्मदिवस हा राष्ट्रीय युवा दिवस म्हणून संपूर्ण भारतात साजरा केला जातो. आजही सर्वांना त्यांचे विचार हे प्रेरणादायी आहेत.
- उठा, जागे व्हा आणि लक्ष्य प्राप्त केल्याशिवाय थांबु नका.
- सामर्थ्य हे जीवन आहे. तर दुर्बलता म्हणजे मृत्यू.
- देशातील दारिद्र्य व अज्ञान घालविणे म्हणजेच ईश्वराची सेवा होय.
- सत्यासाठी सर्व गोष्टींचा त्याग करावा परंतु कोणत्याही कारणास्तव सत्याचा त्याग करू नये.
- चांगल्या पुस्तकाविना घर म्हणजे दुसरे स्मशानच होय.
- कल्पना घ्या. त्या कल्पनेला आपले जीवन बनवा – त्याबद्दल विचार करा, स्वप्न पहा, ती कल्पना जगा. आपल्या मेंदूत, स्नायू, नसा, शरीराचा प्रत्येक भाग त्या विचारात बुडवून राहू द्या आणि उर्वरित विचार बाजूला ठेवा, हा यशस्वी होण्याचा मार्ग आहे.
- जे काही आपल्याला कमकुवत करते – ते विष, शारीरिक, बौद्धिक किंवा मानसिक ते विष समजून त्यागुण द्या.
- दिवसभरातून एकदा तरी स्वत:शी संवाद साधा. तसे केले नाहीत तर तुम्ही या जगातील एका चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमवाल.
- कोणीही तुम्हाला शिकवू शकत नाही, कोणीही तुम्हाला आध्यात्मिक बनवू शकत नाही