रामचंद्र: || मराठी कविता || जय श्रीराम ||

"अयोध्या पती तो त्रिलोकरक्षक: !! मर्यादा पुरुषोत्तम जानकीवल्लभ: !! 
त्याग मूर्ती असा तो पितृभक्त: !! नाव मुखी सदा तो रामचंद्र: !!

कौसल्ये: पुत्र असा जो परब्रह्म: !! आदी अंती असा जो शाश्वत: !!
सत्यवाक् असा जो सत्यविक्रम: !! नाव मुखी सदा तो रामचंद्र: !!

वेद पुराण पारंगत जो वेदस्वरूप: !! शस्त्र हाती असा जो धनुर्धर: !!
दिसे जणू असा जो देवाधिदेव: !! नाव मुखी सदा तो रामचंद्र: !! 

इंद्रिय विजयी असा जो जितेंद्रिय: !! शांत ,संयमी असा तो सौम्य:!! 
गुणांचा आश्रय असा तो त्रिगुण: !! नाव मुखी सदा तो रामचंद्र: !!

लक्ष्मण बंधू असा तो भातृभक्त: !! पवनपुत्र हृदयी असा तो हनुमदाश्रय: !!
रघुकुल श्रेष्ठ असा तो राघव: !! नाव मुखी सदा तो रामचंद्र: !!

अपराजित असा तो जैत्र: !! प्रभू आमचा असा तो महापुरुष: !!
कल्याणकारी असा तो शिव:!! नाव मुखी सदा तो रामचंद्र: !!"

✍️© योगेश खजानदार 

सियावर रामचंद्र की जय !!! जय श्रीराम !!! 

*ALL RIGHTS RESERVED*
जय श्रीराम
जय श्रीराम

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *