राख || RAKH || MARATHI POEM ||

"सांभाळला तो पैसा,
 न जपली ती नाती!!

 स्वार्थ आणि अहंकार,
 ठणकावून बोलती!!

 निकामी तो पैसा,
 शब्द हेच सोबती!!

 आपुलेच सर्व,
 पैशावरी मोजती!!

 ती शेवटची घटका,
 मझ आस न कोणती!!

 राख या शरीराची,
 शेवट रिकामेच हाती!!

 का केला हट्ट??
 जीवन हे खर्ची!!

 राखेवरी आपुले,
 पैशासाठी भांडती!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *