"ती शांतता वेगळीच होती!!
 रडण्याची जाणीवही होती!!
 लाकडास पेट घेताना
 आकाशात झेप घ्यायची होती!!

 आपलंस म्हणारी कोण होती!!
 अश्रु ती ढाळत होती!!
 मन ओल करताना
 मला आगीत पहात होती!!

 माझी झोप शांत होती!!
 डोळे मिटली जातं होती!!
 नात्यास त्या पाहताना
 राखेस आज मिळाली होती!!

 खुप काही सांगत होती!!
 आठवणीत ती राहीली होती!!
 स्मशानात मला शोधताना
 राखेस का बोलत होती!!

 परतुन ती जातं होती!!
 मला मनात साठवतं होती!!
 वेड्या मनाला समजावताना
 राखेत मला शोधत होती!!"
 योगेश खजानदार 

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE