"निखळ मैत्री तुझी नी माझी
 खुप काही तु सांगतेस!!
 तुझ्या मनातल्या भावना
 अलगत का तु बोलतेस!!

 कधी असतेस तु उदास
 तर कधी मनसोक्त हसतेस!!
 माझ्या या मैत्रीची
 एक गोडी तु सांगतेस!!

 रागावतेस कधी हक्काने
 वाट तु दाखवतेस!!
 समजावतेस कधी मनातुन
 आपलंस कधी करतेस!!

 कधी मिळुन धमाल नुसती
 क्षणांना साठवुन तु घेतेस!!
 कधी होतो अबोला ही जेव्हा
 चटकन सार विसरुन ही जातेस!!

 मैत्रीण एक छान तु माझी
 मला तु समजुन ही घेतेस!!
 कधी विसरलो चुकुन तरी
 आठवणही तु करुन देतेस!!

 मैत्री म्हणजे नक्की काय असते
 हे तु मला सांगतेस!!
 मैत्रीण म्हणुन तु ही तेव्हा
 साथ मला नेहमी देतेस … !!!"
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

Scroll Up