"कदाचित त्या वाटा ही
 तुझीच आठवण काढतात!!
 तुझ्या सवे चाललेल्या
 क्षणास शोधत बसतात!!
 पाऊलखुणा त्या मातीतून
 भुतकाळाची साक्ष देतात!!
 एकट्या या मुसाफिरास
 तुझीच साथ मागतात!!
 तु पुन्हा फिरुन यावंस
 हीच वाट पहातात!!
 आणि थांबलेल्या मला
 पुन्हा तुझीच ओढ लावतात!!
 येईल वारा ऊन नी पाऊस
 कसली चिंता करतात!!
 तुझ्या सवे हा जीवन प्रवास
 सगळं काही सहन करतात!!
 त्या वाटा आता पुन्हा
 मला तुझ्याच जवळ आणतात!!
 एकट्या या मुसाफिरास
 पुन्हा साथ तुझीच मागतात!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

संवाद || SANVAD MARATHI SAD POEM ||

“हल्ली तुझ्यात नी माझ्यात ! वादच होत नाहीत !! कारण, हल्ली तुझ्यात नी माझ्यात संवादच होत नाहीत !! ओ…
Read More

मार्ग || MARG MARATHI KAVITA ||

शोधावी ती माणसं जी स्वप्नांशी झुंजत असतात झोपलेल्या उगाच पाहत वेळ वाया घालवू नये…
Read More

बावरे मन || BAWRE MANN || SAD POEM ||

“कळावे कसे मनास आता तू आता पुन्हा येणार नाहीस!! सांगितले तरी त्या वेड्या मनास ते खरं केव्हाच वाटणार …
Read More

कपाट (मनाचं) || KAPAT MARATHI KAVITA||

‘मनाचं कपाट अगदी आठवणींनी भरून गेलं !! त्यात एवढ्या आठवणी झाल्या की, कधी कोणती आठवण भेट देईल सांगता …
Read More

निषेध .!! पण कशाचा ???

एक पुतळा फुटला !! आणि अचानक मनातलं बोलला …! निषेध ..!!! पण कसला ?? पुतळा फुटला म्हणून !! अरे !! प…
Read More
Scroll Up