मुसाफिर || MUSAFIR KAVITA ||

Share This:
"कदाचित त्या वाटा ही
 तुझीच आठवण काढतात!!
 तुझ्या सवे चाललेल्या
 क्षणास शोधत बसतात!!
 पाऊलखुणा त्या मातीतून
 भुतकाळाची साक्ष देतात!!
 एकट्या या मुसाफिरास
 तुझीच साथ मागतात!!
 तु पुन्हा फिरुन यावंस
 हीच वाट पहातात!!
 आणि थांबलेल्या मला
 पुन्हा तुझीच ओढ लावतात!!
 येईल वारा ऊन नी पाऊस
 कसली चिंता करतात!!
 तुझ्या सवे हा जीवन प्रवास
 सगळं काही सहन करतात!!
 त्या वाटा आता पुन्हा
 मला तुझ्याच जवळ आणतात!!
 एकट्या या मुसाफिरास
 पुन्हा साथ तुझीच मागतात!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*