"भावनेच्या विश्वात, आपुलकीच्या जगात, सैरभैर फिरूनी, मी एक शुन्य!!! प्रेमाची ही गोष्ट, भरगच्च पानात, वाचुनही शेवटी, मी एक शुन्य!! यशाच्या शिखरावर, हवे ते मिळवुन, शेवटी एकांती, मी एक शुन्य!! कमावले अचाट, संपत्ती अफाट, अखेरचा तो श्वास, मी एक शुन्य!! आलो रिकामेच, चाललो रिकामेच, लाकडावरी जळताना, अखेर मी एक शुन्य!!" -योगेश *ALL RIGHTS RESERVED*