Skip to content

मराठी कथाकविता.com
  • मुखपृष्ठ
  • कथा
  • कविता
  • मराठी लेख
  • दिनविशेष
  • कॅटेगरीज
  • अध्यात्मिक
  • माहिती
  • संपर्क
  • Call +919923777633 Email Khajandar_yogesh@yahoo.in

मुखपृष्ठ » मराठी लेख

मी आणि माझी आई . || AAI MARATHI ESSAY ||

Category मराठी लेख
मी आणि माझी आई . || AAI MARATHI ESSAY ||
Share This:

“बडबड करणारी आई क्षणभर जरी अबोल झाली तरी मुलाला नकोस होत. घरात आल्या आल्या नजरेत नाही दिसली तरी बैचेन होत. आईने आपल्याला चुकून जरी हाक मारुन नाही बोलावलं तरी मन आईला शोधत फिरत आणि या आईरुपी मायेच्या झाडाला अलगद येऊन बिलगत. आई नावाचं हे झाड किती जरी वठल तरी त्याची सावली हवीहवीशी वाटते ,त्या सावलीत बसून एकदा डोक्यावरती फिरलेला तिचा हात जणू मंद वाऱ्याची झुळूक वाटते, आणि त्या मायेच्या कुशीत साऱ्या जगाची किंमत शून्य वाटते. “
अगदी सहज सुचलेल्या काही ओळी आईला वाचून दाखवल्या आणि तिच्या डोळ्यात चटकन पाणी आल. ‘मी फक्त तुला प्रेम देत राहिले , पण त्या प्रेमाची सुंदर वाख्या तू केलीस हे पाहून खूप बरं वाटलं !!’ अस आई म्हणाली आणि स्वयंपाक घरात निघून गेली. थोड्या वेळाने जेवायला गेलो तेव्हा ताटात माझ्या आवडीच आम्रखंड होत. मी विचारलं, ‘ आई आज काय विशेष आम्रखंड केलंस ते??’ तर आई म्हणते कशी , ‘ असच केलं रे !! अगदी सहजच !! ‘ पण तिच्या गालातल्या त्या स्मितहास्याने मला सगळं काही सांगितलं. तिच्यासाठी लिहिलेल्या त्या चार ओळी तिला इतक्या आवडल्या की तिने त्याबद्दल मला आम्रखंड दिलं. अगदी मनसोक्त खाल्ल्यावर मी पुन्हा वाचत बसलो.

कित्येक वेळ पुस्तकाची पाने चाळत असताना अचानक थोड्या वेळापूर्वीचा प्रसंग मनात घोळू लागला. मी चार ओळी आईसाठी लिहिल्या, अगदी सहजच. तर तिने मला लगेच माझ्या आवडीचे दिले. मग त्या आईने तर आपल्याला आजपर्यंत किती दिले आणि अजूनही देतच आहे. मग आपण त्या आईचे किती देणे लागतो. केला हिशोब . अगदी आठवून आठवून केला. आणि सहज तोंडातून शब्द निघाले ‘ आई!! तुझ्या प्रेमाचे ऋण फिटता फिटत नाही !! सारे आयुष्य खर्ची केले तरी तुझे प्रेम संपता संपत नाही!!’ पुढे काही शब्द पुसटसे ओठांवर येऊन परतून गेले. कारण खिडकीच्या बाहेर झाडावर एक चिमणी आपल्या पिलांना घास भरवत असताना दिसली. मी पुस्तक बाजूला ठेवले आणि खिडकीजवळ जाऊन उभा राहिलो. क्षणभर हरवून गेलो त्या चिमण्यात. आपल्या चोचीत काहीतरी पकडून आणलं होत तिने आणि पिल आपल्या चोची उघड्या करून आकाशाकडे पाहत होती. चिवचिव करणारी ती पिले त्या घरट्यात खाऊन झाल्यावर आपल्या आईला बिलगुन बसली. कित्येक वेळ मी पहात राहिलो.

मनात असंख्य विचार माझ्या नेहमीच गोंधळ घालत असतात. पण त्या दिवशी ती चिमणी आणि तिची पिले एवढाच विचार माझ्या मनात घोळत होता. राहून राहून वाटायचं , मला बोलता येत , मला लिहिता येत ,मला व्यक्त करता येत म्हणून मी लिहिलेल्या चार ओळी आईला वाचून दाखवू शकलो. त्यामुळे माझे तोंडही गोड झाले . पण या मुक्या पक्षाचं , प्राण्याचं काय ?? ती पिल आपल्या आईला कोणत्या शब्दात सांगत असतील आपल्या भावना ?? कस सांगत असेल वासरू आईचं प्रेम ??? पण मनात विचार आला !! या प्रेमाला, या आई आणि पिलाच्या नात्याला!! खरंच शब्दांची गरज आहे ??नाही ना ?? मग कशी होतात व्यक्त हे मुकी जनावरे ?? असंख्य विचार , नुसते शब्द, शब्द आणि शब्द एवढंच असतं का प्रेम ?? तर नाही !! आपल्याला बोलता येत पण त्यांना नाही, पण तरीही ती पिले आईला आपलं प्रेम व्यक्त करतात. तिच्या पंखाच्या सावलीत ,वादळात तिच्यावर विश्वास ठेवतात. ती नक्की आपल्याला चिऊचा घास घेऊन येईल या आशेवर आपल्या आईची वाट पहात बसतात. खरंय मुके पक्षीही आपलं प्रेम आईला अगदी त्यांच्या भाषेत सांगतात. आपल्या मऊ स्पर्शाने सांगतात.

वेळ येताच आई आपली मार्गदर्शक होते. वेळ येताच आपण कुठे चुकलो तर आपल्याला योग्य सल्ला देते !! आपण कितीही वेळा पडलो तरी पुन्हा जिद्दीने उभ राहायला बळही देते !! आई आयुष्याचं सार्थक करते !! समोरच्या त्या घरट्यात ती चिमणी पिलांना आकाशात झेप कशी घ्यावी ते कदाचित शिकवत होती. मी मात्र त्यांच्या भावना माझ्या शब्दात समजून घेत होतो. कदाचित प्रत्येक आई आपल्या पिलाला , बाळाला?? मुलाला?? सगळे सारखेच !! नाही का ?? हेच सांगत असणार . शिकावं कस !! जगाव कस ! मग ते शब्दात असो की कृत्यातून !! माणूस असो की पक्षी, आई ही शेवटी आईचं असते. तीचं प्रेम कधीचं कमी होत नाही. आपल्या पिल्लांना शिकवताना कित्येक वेळा ती पिल्लं धडपडत होती , चिमणी पुन्हा पुन्हा त्या पिल्लाला सावरून घेत होती. आई !! आयुष्य कसे असावे ते सांगत होती !! अगदी मुक्याने ?? हो !!

माझ्या लक्षात येण्या अगोदर एक मस्त कॉफीचा कप माझ्या शेजारी खिडकीत ठेवला गेला. मी क्षणभर वळून पाहिले तर ती आई होती !! मला जाताना एवढंच म्हणून गेली ‘ थंड होण्या आधीच पिऊन घे !! ‘ मी काहीच बोललो नाही . माझं लक्ष बाहेरच त्या चिमण्या सोबत मुक्त संचार करत होत, ती धडपड पाहत होतं, आपल्याला शोधत होतं. आणि पाहता पाहता साऱ्या चिमण्या आकाशात भुर्र्रर करत उडाल्या. साऱ्या आसमंतात फिरून आल्या. जरा चिवचिवाट जास्तच करत होत्या घरट्यात आल्या तेव्हा. बहुतेक आयुष्याची पहिली झेप आनंदाने साजरी करत असतील. हो ना ?? एक पिल्लू आपल्या आईला बिलगुन बसलं होत. आपलं प्रेम तर व्यक्त नाहीना करत ते ?? कदाचित असेलही !! तो कॉफीचा कप अलगद उचलत मी घरात पाहू लागलो, पाठमोऱ्या आईकडे पाहत राहिलो , ती आपल्या कामात व्यस्त होती आणि माझ्या ओठातून नकळत ओळी बाहेर आल्या .

आई !! तुझ्या प्रेमाचे ऋण, फिटता फिटत नाहीत!!
सारे आयुष्य खर्ची केले तरी, तुझे प्रेम संपता संपत नाही !!
कधी नकळत सांगितले मी , कधी अबोल राहिलो मी !!
आई !! तुझे हे प्रेमरूप, शब्दात सांगता येत नाही !!

आई !! तुझे हे प्रेमरूप,शब्दात सांगता येत नाही !!

©✍️योगेश खजानदार

Tags aai Marathi articles marathi lekh marathi story

RECENTLY ADDED

दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||
दुपारचं उन्ह || मराठी लेख || Marathi ||
gold buddha figurine in gold and red floral dress
गणपतीची पट्टी || Ganapati Utsav ||
woman in black long sleeved shirt
तुमच्या आयुष्याचे निर्णय कोण घेत ? तुम्ही की दुसरं कोण ? || Marathi Lekh ||
brown framed eyeglasses on a calendar
वाढदिवस || तिथी की तारीख || Marathi ||

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

TOP POST’S

man couple love people

तुला लिहिताना || Tula Lihitana || Marathi Poem ||

पानांवर तुला लिहिताना कित्येक वेळा तुझी आठवण येते कधी ओठांवर ते हसु असतं आणि मनामध्ये तुझे चित्र येते कधी शब्दात शोधताना पुन्हा उगाच तुझ्याकडे येते भावना ती तुझीच असते कविता होऊन माझ्याकडे येते
Dinvishesh

दिनविशेष १३ मार्च || Dinvishesh 13 March ||

१. चेस्टर ग्रीनवुड यांनी इअरमफचे पेटंट केले. (१८७७) २. अमेरिकेने भौतिकदृष्ट्या आपल्या स्थानावर असलेल्या प्रमाणित वेळेला (Standard Time) मान्यता दिली. (१८८४) ३. विल्यम हर्षेल या खगोलशास्त्रज्ञांनी युरेनसचा शोध लावला. (१७८१) ४. इंडोनेशिया आणि नेदरलँड यांनी आपले राजनैतिक संबंध पुन्हा प्रस्थापित केले. (१९६३) ५. अर्जुन पुरस्कार देण्याची सुरुवात झाली. (१९६३)
couple

हो ना || HO NA || MARATHI LOVE POEMS ||

"गोष्ट फक्त एवढीच होती मला समजून सांगायचे होते आणि तुला समजून घ्यायचे न्हवते
woman looking at hot air balloons

खुदसे यु कहता यही || HINDI || POEMS ||

खुदसे यु कहता यही राह से भटके नही पाप को पुण्य से परास्त होना यही समय के चक्र में दौडती ये जिंदगी भटके रास्तों पर मंजीले मिलती नहीं
श्रीगोपालद्वादशनाम स्तोत्रम् || Devotional ||

श्रीगोपालद्वादशनाम स्तोत्रम् || Devotional ||

शृणुध्वं मुनयः सर्वे गोपालस्य महात्मनः । अनंतस्याप्रमेयस्य नामद्वादशं स्तवम् ॥ १ ॥ अर्जुनाय पुरा गीतं गोपालेन महात्मनः । द्वारकायां प्रार्थयते यशोदायाश्र्च संनिधौ ॥ २ ॥

© 2022 - ALL RIGHTS RESERVED
facebook twitter youtube instagram pinterest