मिठीत माझ्या || MITHIT MAJHYA ||

Share This
"आज शब्दांतुन तिला आठवतांना
 ती समोरच असते माझ्या
 कधी विरहात तर कधी प्रेमात
 रोजच सोबत असते माझ्या!!

बरंच काही लिहिताना
 कधी अश्रु मध्ये असते माझ्या
 कधी कवितेतल्या प्रत्येक ओळीत
 तर कधी भावनेत असते माझ्या!!

कधी पुस्तकाच्या पानांत पहाताना
 त्या गोष्टीत असते माझ्या
 कधी वहीच्या पानांवर कोरताना
 ती ह्रदयात असते माझ्या!!

रागावलेल्या प्रत्येक क्षणात शोधताना
 मनात असते माझ्या
 रुसलेल्या तिच्या गालावरती हरवताना
 ओठांवरती असते माझ्या!!

क्षणात यावी क्षणात जावी
 प्रत्येक घटकेत असते माझ्या
 वेळेही थोडी थांबेल तेव्हा
 जेव्हा मिठीत असेल ती माझ्या!!

हो ना .. !!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

सांजवेळ || SANJVEL MARATHI POEM ||

ती झुळूक उगा सांजवेळी मला हरवून जाते मावळतीच्या सुर्यासवे एक गीत गाते त्या परतीच्या पाखरांची …
Read More

शब्द माझे || MARATHI STATUS ||

“लिहिल्या कित्येक शब्दांनी मलाच बोल लावले आहेत माझ्या मनातल्या तुझ्या ते प्रेमात नकळत पडले आहेत…
Read More

Next Post

अखेर || AKHER MARATHI KAVITA ||

Tue May 30 , 2017
मी हरलो नाही मृत्युच्याही डोळ्यात पाहुन अखेर मी हरलो नाही मी एकटा ही नाही अंताच्या या प्रवासात अखेर मी एकटा नाही