“माहितेय मला
तु माझी नाहीस!!!
माझ्या स्वप्नातली
आयुष्यात नाहीस!!
दुरवर उभा मी
वाट पहात तुझी!!
माहितेय मला
तु येणार नाहीस!!
पण तरीही हट्ट
तुझ्या आठवणींचा!!
डोळ्यातील आसवांचा
निराश या वाटेचा
माहितेय मला
तुला हे कळणार नाही!!
कधी मंद प्रकाशात
कधी पाऊसात
माझ्या कवितेत ही
माहितेय मला
तुला मी विसरणार नाही!!”

– योगेश खजानदार

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा