"शोधावी ती माणसं जी स्वप्नांशी झुंजत असतात झोपलेल्या उगाच पाहत वेळ वाया घालवू नये!! शोधावे ते मार्ग जे तुम्हाला खुणावत असतात उगाच सगळे जातात म्हणून चालत राहू नये!! शोधावे ते ध्येय जे तुम्हाला बोलत असतात उगाच दुसऱ्यात कधी स्वतः स पाहू नये!! शोधावी ती आग जी तुम्हाला पेटवत असते दुसऱ्याच्या आगीत कधी खाख होऊ नये!! शोधावी ती जिद्द पुन्हा उभा राहण्यासाठी उगाच हताश होऊन रडत बसू नये!! शोधावी ती ओळख आपलीच आपल्यासाठी उगाच कोणाच्या सावलीत उभा राहू नये..!" ✍️योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
मार्ग || MARG MARATHI KAVITA ||
