मातृभक्त असावा ऐसा , जिथे विश्व सामावून जावे !! पृथ्वी प्रदक्षिणा करावयास, त्याने आईबापा भोवती फिरावे !! निरागस त्याच्या खोड्यांस, तिने नकळत हसून पहावे !! घडावा मग एकदंत, नी मातृत्व पार्वती परी असावे !! वचन ते आईबापाचे , परी त्यापलीकडे काही न जावे !! हसतहसत त्याने, सारे सुख सोडून द्यावे !! आई बापाचे तेव्हा, संस्कार ते जपावे !! घडावा तो राम , मातृत्व कौसल्ये परी असावे !! कर्तव्याची जाणीव, त्याने विश्र्वरुप दाखवावे !! महाभारत रचून, जगण्याचे मार्ग सांगावे!! तरीही मस्तक नेहमी, मातृ चरणी ठेवावे !! घडावा तो कृष्ण, मातृत्व देवकी परी असावे !! अजिंक्य तो एक, कर्तुत्व त्याचे पहावे !! एका शब्दात त्याने, सारे समजून घ्यावे !! श्रेष्ठ धनुर्धारी तो, प्रथम मातेस पुजावे !! घडावा तो अर्जुन, मातृत्व कुंती परी असावे !! विनम्र त्याचे, वेगळे काय सांगावे !! थकल्या आईबापाचे, ओझे त्याने उचलावे !! अंधळ्या त्या जीवाचे , डोळे त्याने व्हावे !! घडावा तो श्रावण बाळ, मातृत्व ग्यानवंती परी असावे !! मातृभक्त असावा ऐसा, जिथे विश्व सामावून जावे !! ✍️© योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*
