"शोधायचं आहे आज
 माझेच एकदा मला!!
 कधी कोणत्या वळणावर
 भेटायचं आहे मला!!

 कधी अनोळखी होऊन
 विचारायचं आहे मला!!
 कधी हरवलेल्या विचारात
 पहायचं आहे मला!!

 नसेल चिंता कशाची
 मुक्त फिरायच आहे मला!!
 बांधलेल्या हातास आता
 सोडायचं आहे मला!!

 आपल्यात आपण, सगळ्यात सगळे
 अस्तित्व पाहायचे आहे मला!!
 वेगळं होऊन या दुनियेत
 जगायचं आहे मला!!

 मी ,माझा , माझ्यात मीच
 कोण आहे बघायचं आहे मला!!
 कधी स्वतःस भेटून एकदा
 विचारायचं आहे मला!!

 उधळून, फेकून, जाळून ही
 ही लखतर फेकायची आहेत मला!!
 माणूस म्हणून या जन्मात
 जगायचं आहे मला!!

 हो !!माणूस म्हणून या जन्मात
 जगायचं आहे मला !!!"

 ✍योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE