माणुसकीला जाग मित्रा || MANUSKI MARATHI BHASHA ||

Share This:
"बास कर नाटक माणुसकीची!!
 दगडाला फासलेल्या शेंदुराची!!
 अरे ते कधी बोलत नाही!!
 देव आहे की कळत नाही!!
 अमाप पैसा लुठताना!!
 तिजोरी कुठे भरत नाही!!
 मी आता देव मानत नाही!!
 दगडाला शेंदूर फासत नाही!!
 माणुसकीवर बोलताना!
 देव कधी भेटत नाही!!
 उट आता सज्ज हो!!
 आपल्या पणाला जागा हो!!
 मानसातला देव जाण अधी!!
 दगड कधी बोलत नाही. ..!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*