एक बहिण म्हणुन आता मला एवढंच सांगायचं आहे!! रक्षण करणाऱ्या माझा भावाला थोडसं बोलायचं आहे!! करायचं असेल रक्षण माझ तर मला वचन हवं आहे!! प्रत्येक स्त्रीचा आदर करणारा समाज मला पाहायचा आहे!! उदरातच मला मारणाऱ्या हातांना थांबवणारा बाप मला हवा आहे!! एक मुलगी म्हणून या समाजात सोबतीने चालणारा मित्र पाहिजे आहे!! नजरेचे कित्येक घाव माझ्यावर रोजच मी सोसते आहे!! त्याच नजरेत रे भावूराया मला स्त्रीचा सन्मान केलेला पाहायचा आहे!! आई , बहिण अशा कित्येक नात्यात तु मला रोजच पाहतो आहे!! कधीतरी एक स्त्री म्हणून माझ्याकडे तु एकदा पाहायची गरज आहे!! एवढीच एक छोटी मागणी तुझ्याकडे मी करते आहे!! एक बहिण म्हणून मी आता एवढंच मागते आहे !!! ✍योगेश *ALL RIGHTS RESERVED*