"मी पाहिलय तुला
 माझ्या डोळ्या मध्ये
 समोर तु नसताना
 माझ्या आसवांना मध्ये
 झुरताना मनातुन
 माझ्या कविते मध्ये
 शब्दाविना गुणगुणत
 माझ्या गाण्या मध्ये!!!

 हो सखे, मी पाहिलय तुला
 खळखळ वाहणार्‍या नदीमध्ये
 सळसळत जाणार्‍या
 वार्‍या मध्ये
 रात्रीच्या आकाशातील
 चांदण्या मध्ये
 आणि ग्रीष्मात पडणार्‍या
 पावसा मध्ये!!

 हो सखे, मी पाहिलय तुला
 मी नसताना माझ्या मध्ये
 आठवणीतल्या गावामध्ये
 ह्रदयात रहाणार्‍या श्वासा मध्ये
 अबोल राहुन माझ्या प्रेमा मध्ये
 हो सखे, मी पाहिलय तुला!!"

 ✍️ योगेश

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE