माझे मन || VIRAH KAVITA || LOVE POEM ||

"माझे मन का बोलते??
  तु आहेस जवळ!!
  वार्‍यात मिसळून
  सर्वत्र दरवळत!!

  कधी शोधले तुला मी
  मावळतीच्या सावलीत
  तु मात्र आहेस
  मिटलेल्या कळीत!!

  पुन्हा का पहावे
  तु आहेस ओंजळीत!!
  हलकेच उघटता
  सर्वत्र पसरत!!

  शोधले तुला मी
  या चारी दिशाही
  तु मात्र आहेस
  चांदण्या रात्रीत!!

  पुन्हा का मिटावे
  हे डोळे अलगद
  तु मात्र आहेस
  माझ्या मिठीत!!

  स्वतःस विसरुन
  माझ्या जगात..!!"

 -योगेश

*ALL RIGHTS RESERVED*

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *