अथांग भरलेल्या सागराचे कोणी मोजेल का पाणी त्या सम माझ्या आईचे प्रेम!! नजरेत दिसते आकाश सारे सामावून घ्यावे मिठीत वारे त्या सम् माझ्या आईचे मन!! त्या मंदिरी बैसला देव एक त्याची पहावी अनेक रूपं त्यात सर्वात सुंदर माझ्या आईचे रूप!! ती आठवते आजही कुस नसे चिंता कोणती असता त्यात ती मायेची ऊब तो आईचा पदर!! घडल्या अनेक मूर्ती कोरले अनेक शिल्प आठवणीत राहिले कित्येक विचार सोबतीस माझ्या आईचे संस्कार!! उन्हात सारी तळपती झाडे सावल्यात त्यांच्या सुखावून जावे त्या सावल्या सम माझ्या आईचा सहवास!! गडगडल्या ढगातून सरी पडव्या पाण्यास व्याकुळ त्या जमिनीस मिळाव्या त्या सम मी समावतो आईच्या मिठीत!! जगात शोधून कोणी दुसरे नाही आईच्या जवळ सारी दुनिया राही त्या दूनियेस नमन माझ्या आईचे चरण!! ✍योगेश *ALL RIGHTS RESERVED*