एक एक विचारांची साथ घेऊनी
घडला हा महाराष्ट्र देश!!
शिवराय आणि जिजाऊंचा
हाच तो महाराष्ट्र देश!!
बांधली एक एक वीट गडांची
इतिहासाची साक्ष देतो महाराष्ट्र देश!!
ज्ञानेश्वर , तुकारामाची गाथा बोलतो
हाच तो महाराष्ट्र देश!!
कित्येक लढले कित्येक मावळे घडले
प्रत्येकास मस्तकी घेतो तोच हा महाराष्ट्र देश!!
विदर्भ , कोकण , मराठवाडा कित्येक इथे वेगळेपण
गर्वाने मराठी बोलतो तोच हा महाराष्ट्र देश!!
प्रत्येकास आपल्या मनात घेतो
तोच हा महाराष्ट्र देश!!
आपुलकी आणि प्रेमाचं नाव म्हणजे
हाच तो महाराष्ट्र देश!!
गर्वाने सांगतो आम्ही
हा आमचा महाराष्ट्र देश!!
जिथे आई भवानीच्या आशीर्वादाने
घडले स्वराज्य तोच हा महाराष्ट्र देश !!
✍योगेश खजानदार
*ALL RIGHTS RESERVED*