"माझ्या मनाच्या तिथे एक
 तुझी आठवण सखे गोड आहे!!
 कधी अल्लड एक हसू तुझे
 कधी उगाच रागावणे आहे!!

 का पाहुनी न पाहणे तुझे ते
 त्या नजरेत बोलणे आहे!!
 सखे तुझ्या अबोल भाषेचे
 कित्येक बोलके शब्द आहे!!

 आजही तो हात तुझा हातात
 तो स्पर्श जाणवतो आहे!!
 कित्येक भेटीतील तुझे
 मी क्षण वेचतो आहे!!

 ओढ तुझ्या भेटीची मी
 वहीच्या पानास सांगतो आहे!!
 तुला भेटण्यास ते पानही
 उगाच आतुर झाले आहे!!

 मन हे खोडकर उगाच
 तुझेच चित्र दाखवते आहे!!
 आठवणीतल्या तुला पाहून
 तुझ्याच प्रेमात पडते आहे!!

 सखे तू सोबत नसण्याची
 एकच तेवढी खंत आहे!!
 तुझ्यासवे असलेल्या क्षणांची
 आठवण ती गोड आहे …!!"

 ✍योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*
SHARE