"काहीतरी राहून जावं!! अस मन का असतं!! झाडावरची पाने गळताना उगाच का ते पहात असतं!! हे मिळावं ते रहावं!! स्वतःस का सांगत असतं!! काही तरी गमावल्यावर लपुन का ते रडतं असतं!! मी आहे माझ हे सर्व!! माझ माझ का करत असतं!! कुठेतरी सर्व हरवल्यावर दोष का ते देतं असतं!! सांग तरी काय चुकलं!! कोणाला ते विचारत असतं!! उत्तर इथे नाही मिळताच एकांतात का ते राहतं असतं!! मन हे मनच अखेर!! स्वतःचा तळ शोधत असतं!! कुठेतरी रस्ता चुकल्यावर वाट का ते शोधत असतं..!!" -योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*