“तुटलेल्या मनाला आता
दगडाची अभेद्यता असावी
पुन्हा नसावा पाझर त्यास
अश्रूंची ती जाणीव असावी
शब्द आहेत आठवणीतले
त्यास एक वाट असावी
राहुन गेली वचने सारी
मनास ना खंत असावी
धुसर त्या क्षणांमध्ये
अबोल सारी चित्रे असावी
अस्पष्ट त्या प्रेमास आज
नात्याची ओळख असावी
भटकणार्‍या मनास एक
हक्काची जागा असावी
पुन्हा नसावा पाझर त्यास
अश्रूंची ती जाणीव असावी!!”

✍️ योगेश

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा