मन स्मशान || SMASHAN MARATHI KAVITA ||

"जळाव ते शरीर दुखाच्या आगीत
 मरणाची सुद्धा नसावी भीती!!
 पिशाच्च बनावं स्वार्थी दुनियेत
 माणुस म्हणुन नसावी सक्ती!!
 पडावा विसर त्या विधात्याला
 कोणाची आता वाजवावी किर्ती!!
 हे दुःख व्हावे असह्य आता
 अश्रु रक्ताचे डोळ्यात दिसती!!
 हा कोणता त्रास कळला कोणास
 कुठे असेल यास मुक्ती!!
 मन हे स्मशान जळती कायम
 विचारांची इथे राख दिसती!!
 आपलेच आपल्यात असुन नाहीत
 ही आग मनात का पेटती!!
 एकांत माझा एक चिता ती
 स्वार्थी दुनियेत कायम जळती!!"
 ✍️ योगेश

*ALL RIGHTS RESERVED*