“मन माझ आजही
तुलाच का बोलत
तुटलेल्या नात्याला
जोड का म्हणत
नको विरह तुझा
सोबत तुझी मागत
नको ही आठवण
क्षण का जपत
कस समजावु याला
माझ न ऐकतो
नातं सपल तरी
प्रेम तुझ मागत
आठवणीच्या गर्दीत
तुलाच का शोधत
तुटलेल्या नात्याला
जोड का म्हणत

मन माझ आजही
तुलाच का बोलत!!”

-योगेश खजानदार

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा