मन बावऱ्या क्षणाला, तुझ्यात हरवून का जावे ?? ओठांवर त्या हसऱ्या, उगाच मग ते यावे !! बोलावे ते सारे, मनात विसरून मी जावे !! सांगावे ते तेंव्हा, पानावर पण का लिहावे ?? बहरून गेल्या फुलात, गंध दरवळून ते जावे !! तुझ्या माझ्या नात्यात, जणू पहाट घेऊन यावे !! कधी सावरावे तू, कधी सावरून मी घ्यावे !! कधी बोलावे तू, कधी अबोल मी ऐकावे !! चांदणी जणू तू, मी आकाशी मग पहावे !! चंद्रासवे भांडता त्या, तुलाच मी जणू मागावे !! नकळत तेव्हा हात, हातात मग तू द्यावे !! अबोल त्या नजरेतून ,सारे ते तुझं कळावे !! पानावरचे ते शब्द, नकळत तू वाचावे !! ओठांवर त्या हसऱ्या, उगाच मग ते यावे !! मन बावऱ्या क्षणाला, तुझ्यात हरवून का जावे ?? ✍️© योगेश खजानदार