मन आणि तू..!|| TU MARATHI KAVITA ||

"एका मनाची ती अवस्था
  तुला आता कसे मी सांगू!!
  तुझ्याचसाठी त्याचे रुसणे
  त्यास आता कसे मी समजावू!!

 तु नसताना तुझ्याचसाठी
  त्याचे आठवणे कसे मी विसरु!!
  तु असताना तुझ्याचसाठी
  त्याचे गुणगुणे कसे मी ऐकवु!!

 रेखाटले ते चित्र तुझे जेव्हा
  माझ्या ह्रदयातुन कसे मी पुसु!!
  भेटले ते तुला कधी तर
  त्यास आता कसे मी आडवु!!

 हे मन वेडे तुझ्याचसाठी
  कविता करताना कसे मी वाचु!!
  ओठांवरती येता ते शब्द
  तुझ्याच समोर ते कसे मी म्हणु!!

 प्रेमात पडताच विसरले मलाही
  माझीच ओळख कसे मी करू!!
  विसरुन गेले मलाच ते मन
  तुला विसरण्यास कसे मी सांगु!!

 मनात माझ्या तुच तु आता
  स्वतःस आता कसे मी शोधु!!
  एका मनाची ती अवस्था
  तुला आता कसे मी सांगु!!"
 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

मनाचा गुंता || MANACHA GUNTA ||

गुंतण म्हणजे काय असतं स्वतःलाच स्वतः हरवायचं असतं अतुट अश्या बंधनात कधी उगाच स्वतःला अडकवायच असतं…
Read More

बालपण || BALGIT || POEMS ||

आभाळात आले पाहुणे फार ढगांची झाली गर्दी छान पाऊस दादांनी भिजवले रान रानात साचले पाणी फार मित्रां…
Read More

लहानपणं || MARATHI BHASHA || KAVITA ||

कधी कधी वाटतं पुन्हा लहान व्हावं आकाशतल्या चंद्राला पुन्हा चांदोबा म्हणावं विसरुन जावे बंध सारे आणि…
Read More

Next Post

अधुरी प्रित || A Short Heart Touching Love Story ||

Wed May 3 , 2017
तु समोरुन जाताना ज्यावेळी अनोळखी असल्याचा भास देऊन गेलीस त्याचवेळी नात्याचे कित्येक बंध मी विसरुन गेलो पण मला हे कधी कळलच नाही की तुझ माझ्याकडे न पहाणं हे सुद्धा एक काळजीच होतं. मी वेडाचं आहे जो तुझ्या त्या अबोल शब्दांस