"वादळास विचारावा मार्ग कोणता?? रात्रीस विचारावा चेहरा कोणता?? लाटेस विचारावा किनारा कोणता?? की मनास या विचारावा ठाव कोणता?? उजेडास असेल अंधाराशी ओळख!! पाण्यास असेल त्रुश्नेशी ओळख!! मातीस असेल त्या रस्त्याची ओळख!! की आठवणीस असेल आपल्याची ओळख!! वेळ ही क्षणाला विसरून जाईल!! माती या आकाशास विसरून जाईल!! झाड या पानांस विसरून जाईल!! की ही आठवण आपल्यास विसरून जाईल!! पहाटेस ओढ या किरणांची राहिलं!! चांदण्यास ओढ या चंद्राची राहिलं!! ढगांस ओढ या पावसाची राहिलं!! की मनास ओढ या आठवणीची राहिलं!! चंद्रास सोबत त्या आकाशाची असेल!! झाडास सोबत त्या वार्याची असेल!! समुद्रास सोबत त्या लाटांची असेल!! की जणु मनास सोबत या आठवणींची असेल ..!! अगदी कायमची …!!!" ✍️©योगेश खजानदार *ALL RIGHTS RESERVED*