“कुठे असेल अंत
मनातील विचारांचा
एक घर एक मी
आणि या एकांताचा

भिंती बोलतील मला
संवाद हा कशाचा
आरशातील एक चित्र
शोध हा स्वतःचा

क्षणात जोडावी नाती
प्रश्न हा कशाचा
नको तो राग उगाच
स्वार्थी या शब्दाचा

मी असेल मी फक्त
शोध या जगाचा
कुठे असेल अंत
मनातील विचारांचा!!”

✍️ योगेश

आपल्या प्रतिक्रिया नक्की कळवा