"तो ओठाचा स्पर्श अजुनही
  जाणवतो मला माथ्यावर
  तुझ्या भावना अबोल होऊन
  बोलल्या त्या मनावर
  माझीच तु आणि तुझाच मी
  एक जाणीव होती नात्यावर
  विसरुन जाईल जग हे सारे
  जादु कसली ही क्षणांवर!!

 तो ओठाचा स्पर्श अजुनही
  जाणवतो मला हातावर
  तुझ्या सवे चालताना
  सोबत हवी त्या वाटांवर
  कधी नसेल एकटाच मी
  जाणीव करते मनावर
  देईन साध तुझी अखेरपर्यंत
  सांगतो तो स्पर्श ह्रदयावर!!

 तो ओठाचा स्पर्श अजुनही
  जाणवतो मला गालावर
  रुसलेल्या मला तो जणु
  बोलतो या ह्रदयावर
  क्षणात जातो राग कुठे
  दिसतो ना मनावर
  तो ओठाचा स्पर्श तुझ्या
  हसु उमटवतो माझ्या ओठावर.. !!!"

 -योगेश खजानदार

*ALL RIGHTS RESERVED*

READ MORE

क्षण .. !! || KSHAN MARATHI KAVITA ||

मी आजही त्या क्षणाना तुझ्याच आठवणी सांगतो कधी शोध माझा नी तुझ्यातच मी हरवतो नसेल कदाचित वाट दुसर…
Read More

Online || MARATHI POEM ||

या online आणि offline चा जगात नातीच आता सापडत नाही कधी like आणि share मध्ये कोणालाच मन कळत नाही …
Read More

एकांत || EKANT KAVITA MARATHI ||

का छळतो हा एकांत मनातील वादळास भितींवरती लटकलेल्या आठवणीतल्या चित्रात बोलतही नाही शब्द खुप काही…
Read More

अखेर || AKHER LOVE POEM MARATHI ||

एकांतात राहशील ही तु बुडत्या सुर्याकडे पहाणार तो मी नसेल मोकळेपणाने कधी हशील ही तु पण हसवणारा म…
Read More

राग ||RAG KAVITA ||

तिने रुसुन बसावे मी किती मनवावे नाकावरच्या रागाला किती आता घालवावे उसण्या रागाचे बघा किती नखरे …
Read More

एक तु || EK TU MARATHI KAVITA ||

कसे सांगु तुला माझ्या मनातील तु या शब्दा सवे सखे गीत गातेस तु  मी पाहता तुला अबोल होतेस तु मी बोलत…
Read More
Scroll Up